मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या पाचही आरोपींनी बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या कट रचल्याचा आरोप आहे. शुक्रवारी मुंबई पोलिसांना या आरोपींना अटक करण्यात यश आले आहे.
हे वाचलंत का? - मविआचा वाद चव्हाट्यावर! संजय राऊत काँग्रेस नेत्यांची हायकमांडकडे तक्रार करणार
बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बिष्णोई गँगने या हत्येची जबाबदारी स्विकारली आहे. याप्रकरणी आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाच जणांना अटक केली आहे. पनवेल आणि कर्जत इथून या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींवर खुनाच्या कटात सहभाग असल्याचा आरोप आहे. दरम्यान, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात याआधी पोलिसांनी चार जणांना अटक केली होती.