मविआचा वाद चव्हाट्यावर! संजय राऊत काँग्रेस नेत्यांची हायकमांडकडे तक्रार करणार

    18-Oct-2024
Total Views |
 
Raut
 
मुंबई : महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असताना त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. संजय राऊतांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत काँग्रेस नेत्यांची हायकमांडकडे तक्रार करण्याबाबत सूचक विधान केले.
 
संजय राऊत म्हणाले की, "महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा अधिक वेगाने व्हावी आणि तातडीने निर्णयापर्यंत यावं, अशी आमची अपेक्षा आहे. २०० पेक्षा जास्त जागांवर आमची सहमती आहे. पण उरलेल्या जागांवर पेच निर्माण झालाय. आज माझं रमेश चेन्निथला आणि मुकुल वासनिक यांच्याशी बोलणं झालं. यासोबतच मी आज राहूल गांधींसोबतही बोलणार आहे. जागावाटपाच्या निर्णयाला गती मिळावी, याबाबत मी त्यांच्याशी बोलणार आहे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? - महिन्याचे १०० कोटी वसुल केले म्हणून आमचे वसुलीबाज काका...; आशिष देशमुखांची अनिल देशमुखांवर टीका  
 
ते पुढे म्हणाले की, "अनेक जागांवर तोडगा निघालाय तर काही जागांवर अजून निर्णय झालेला नाही. आता वेळ कमी आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत. त्यांना वारंवार दिल्लीत यादी पाठवावी लागते मग त्यावर चर्चा होते. पण आता ती वेळ निघून गेलीये. त्यामुळे लवकरात लवकर जागावाटपाचा निर्णय व्हावा असं आम्हाला वाटतं. शिवसेना आणि राष्ट्रवादीत जास्त मतभेद नाहीत. काही जागांवर तिन्ही पक्षांचा दावा आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेस हायकमांडशी चर्चा केली," असे त्यांनी सांगितले.