महिन्याचे १०० कोटी वसुल केले म्हणून आमचे वसुलीबाज काका...; आशिष देशमुखांची अनिल देशमुखांवर टीका
18-Oct-2024
Total Views | 227
नागपूर : महिन्याचे १०० कोटी वसुल केले म्हणून आमचे काका १३ महिने आत गेले, अशी टीका भाजप नेते आशिष देशमुख यांनी माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुखांवर केली आहे. अनिल देशमुखांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
आशिष देशमुख म्हणाले की, "आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत कधीही कुणी आपल्या वडीलधाऱ्या लोकांबद्दल लहानांनी बोलायला नको. मीसुद्धा मागच्या पाच वर्षांपासून अनिल देशमुखांच्या विरोधात लढलो असलो तरी त्यांच्यावर टीका करणं मी टाळलं. पण परवा पत्रकार परिषद घेऊन ते माझ्याबद्दल उलटसुलट बोलले. मला भगौडा म्हणाले."
"पण आमचे काका किती वसुलीबाज आहे हे सर्वांना माहिती आहे. १०० कोटी रुपये महिन्याचे वसुल केले, भ्रष्टाचार केला म्हणून १३ महिने आत गेले. आम्हालासुद्धा याचं दु:ख झालं. पण गावातील एखादा पोलिस त्यांना अटक करत असेल तर काहीतरी गडबड केली असेलच. गृहमंत्र्यांना जेल होते म्हणजे दाल में कुछ तो काला होगा. मी याबाबत त्यांच्याविरोधात कधीही बोललो नव्हतो, पण तुम्ही जर मोठं असून मोठेपण दाखवत नसाल तर आशिष देशमुख तुमच्यावरील आरोपांचं उदाहरण लोकांना देणार," असेही ते म्हणाले.