शाहरुखच्या ‘जवान’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी रचले अनेक रेकॉर्ड

08 Sep 2023 11:54:30
 
jawan
 
मुंबई : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाने देशभरात तुफान आणले आहे. ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने इतर चित्रपटांचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. २०२३ या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित झालेल्या पठाण या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. त्यानंतर आता ‘जवान’ने देखील प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कमाई केली आहे. जवानने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी नवे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.
 
सॅकल्निकच्या अहवालानुसार, हिंदी भाषेत या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ६५ कोटींचा गल्ला जमवला असून तमिळ भाषेत ५ कोटी आणि तेलुगू भाषेतही ५ कोटी कमावले आहेत. ‘जवान’ने पहिल्याच दिवशी एकूण ७५ कोटींची यशस्वी कमाई केली आहे. याशिवाय ‘जवान’ने अॅडव्हान्स तिकिटांच्या बुकिंगमध्ये १० लाखांहून अधिक तिकिटांची विक्री केली होती. तसेच, प्रदर्शनाच्या दिवशी ६० कोटींचा टप्पा पार करणारा शाहरुखचा जवान पहिला चित्रपट ठरला आहे. इतकेच नव्हे तर ‘जवान’ युएसएमध्ये प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांत बाजी मारली असून युएसएमध्ये या चित्रपटाची ३३ हजार तिकिटे विकली गेली.
 
“३० वर्षांपासून शाहरुखने...”, कमल हसन यांनी किंग खानचे केले कौतुक  
 
शाहरुखने मानले चाहत्यांचे आभार
 
दरम्यान, ‘जवान’ चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या भरभरुन प्रतिसादामुळे शाहरुख खान भारावून गेला आहे. ट्वीट करत त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत. शाहरुखने ट्वीट करत लिहिलं आहे. “मी प्रत्येक चाहत्याचे आभार मानतो जो आनंदाने चित्रपटगृहात ‘जवान’ बघण्यासाठी गेला आहे. तसेच चित्रपटगृहांबाहेर आनंद व्यक्त करणाऱ्या चाहत्यांचेही मनापासून आभार.”
 
 
 
 अ‍ॅटली कुमार दिग्दर्शित या चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पादुकोण, संजय दत्त आणि मराठमोळी गिरीजा ओक असे अनेक दमदार कलाकार आहेत.
Powered By Sangraha 9.0