“३० वर्षांपासून शाहरुखने...”, कमल हसन यांनी किंग खानचे केले कौतुक
31-Aug-2023
Total Views | 24
मुंबई : बहुचर्चित जवान चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. अभिनेता शाहरुख खान याने गेल्या वर्षी पठाण चित्रपट प्रेक्षकांना भेट दिला होता. आणि यावर्षी जवान चित्रपटाची भेट तो चाहत्यांसाठी घेऊन आला आहे. याच चित्रपटावरुन दाक्षिणात्य कलाकार कमल हसन यांनी शाहरुखचे कौतुक केले आहे.
कमल यांनी म्हटले की, ‘जवान’ या चित्रपटाच्या निमित्तानं भारतातील नवोदित कलाकारांमधील टँलेंट समोर येताना दिसत आहे. किंग खानकडे आपण प्रेमाचे प्रतिक म्हणून पाहिले पाहिजे. गेल्या तीस वर्षांपासून त्यानं त्याची ही प्रतिमा जपली आहे. त्याच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसादच आपल्याला खूप काही सांगून जातो. त्याने आपली लव्हेबल इमेज जपून ठेवली आहे, अशा शब्दांत कौतुकांचा वर्षाव कमल हासन यांनी केला. अॅटली दिग्दर्शित जवान चित्रपटामध्ये शाहरुखसोबत विजय सेतुपति, नयनतारा, प्रियामणि तसेच सान्या मल्होत्रा, गिरीजा ओक आणि सुनील ग्रोव्हर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ७ सप्टेंबर रोजी जवान देशभरात प्रदर्शित होणार आहे.