शेअर मार्केट अपडेट्स: ना फार ना फार तोटा आजचे शेअर मार्केट संथच

शेअर मार्केटमध्ये " इक्विलीब्रिअम "

    25-Sep-2023
Total Views |
Stock
 
 
शेअर मार्केट अपडेट्स: ना फार ना फार तोटा आजचे शेअर मार्केट संथच
 
शेअर मार्केटमध्ये ' इक्विलीब्रिअम '
 
 
मुंबई: आज शेअर बाजारात फारशी तेजी आणि पडझडही पहायला मिळाली नाही. निफ्टी ५० इंडेक्स ०.३ पूर्णांकांने वाढून १९६७४.५५ ला क्लोजिंग बेलनंतर थांबला. BSE सेन्सेक्स १४.५४ पूर्णांकांने वधारला असून क्लोजिंग बेलनंतर ६६०२३.६९ वर थांबला आहे. काही दिवस मंदीच्या पार्श्वभूमीवर फेडरल बँकेचे व्याजदर व आर्थिक व्यवस्थेतील महागाई नियंत्रणासाठी अमेरिकन फेडरल बँकचे पाऊल या कारणांमुळे मार्केट मध्ये फार उलाढाल दिसली नाही.
 
 
आज अर्थतज्ज्ञांनी देखील पुढील आरबीआयच्या वित्तीय धोरणात रेपो दर बदलणार नसल्याचे संकेत दिले आहेत. बजाज फायनान्स, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट,बजाज फिनसर्व या शेअर्सने थोड्या प्रमाणात नफा नोंदविला परंतु दुसरीकडे आयटी शेअर मात्र कोसळले आहेत.
 
 
Microns, Aro Granite, Oriental Trimex, Coal India, Gujarat Mineral Dvpt Corporation, हे शेअर्स तेजीतले टॉप गेनर राहिले.दुसरीकडे Ashapura Minechem, KIOCL, Lexus, Madhav Marbles, Orisa Minerals हे शेअर्स कोसळून टॉप लूजर ठरले आहेत