Yatra चा आयपीओ आजपासून बिडींगसाठी खुला

अंतिम तारीख २० सप्टेंबर.Price Band १३५-१४२ रुपये प्रति शेअर

    15-Sep-2023
Total Views |
Yatra
 
 
Yatra चा आयपीओ आजपासून बिडींगसाठी खुला
 
 
अंतिम तारीख २० सप्टेंबर.Price Band १३५-१४२ रुपये प्रति शेअर
 
मुंबई:आजपासून Yatra कंपनीचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी बाजारात येणार आहे. आज सप्टेंबर १५ पासून ते २० सप्टेंबर पर्यंत बिडिंग साठी तो खुला असेल.१३५-१४२ रुपयांचा Price Band मध्ये हे इक्विटी शेअर्स विक्रीस उपलब्ध असतील.१०५ इक्विटी शेअर्सचा संच उपलब्ध असल्याने मल्टी व्यवहारांकरिता १०५ शेअर्सचे व्यवहार करता येणार आहे.हरियाणा येथील ट्रॅव्हल्स कंपनी यात्रा ने नुकतेच अँकर गुंतवणूकदार ( इन्स्टिट्युटशनल इनव्हेसटर) मार्फत ३४८.७५ कोटींचा निधी ग्रहण केला होता.
 
Marquee Investors,Morgan Stanley,Goldman Sachs,Societe Generale,BNB Paribas Arbitrage,Elara India, Opportunities  Fund, Whiteoak Capital, Quantum - State Investment Fund या गुंतवणूकदारांनी अँकर गुंतवणूकदार म्हणून यात सहभाग नोंदवला आहे.
 
१२.२ मिलियन शेअर्स प्रमोटर, सद्य स्थितीतील गुंतवणूक यांच्याकडून OFS ( Offer For Sale) उपलब्ध असतील.बाकी ६०२ कोटी रुपयांचा शेअर्सचा फ्रेश इश्यू उपलब्ध असणार आहे.
 
या निधीचा वापर कंपनी 'Strategic Investments' , व्यवसाय वाढ, व्यवसाय व्याप्ती साठी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. इतर कंपनीच्या कामकाजात, तंत्रज्ञान, इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये या निधीचा वापर होईल.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.