दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचे फेसबुक अकाऊंट हॅक

28 Jul 2023 13:36:28

prabhas



 बाहूबली चित्रपटापासून खरं तर प्रेक्षकांच्या मनात घर केलेला तेलुगु अभिनेता प्रभास सध्या अडचणीत आला आहे. प्रभास तसा समाज माध्यमावर फारसा सक्रिय नसला तरीही त्याचे फेसबुक पेज हॅक झाल्याचे सांगण्यात येत आहे. खुद्द प्रभासने ही माहिती दिली आहे. गुरुवारी २७ जुलैच्या रात्री प्रभासचे फेसबुक पेज हॅक झाले असून हॅकर्सनी त्याच्या फेसबुकवरून ‘अनलकी ह्युमन’ आणि ‘बॉल फेल्स अराउंड द वर्ल्ड’ असे दोन व्हिडिओ शेअर केले होते. या घटनेनंतर प्रभासने ट्वीटरवर माहिती देत फेसबुक पेज हॅक झाल्याची माहिती दिली.
 
 
 
प्रभास आदिपुरुषच्या अपयशानंतर आता अॅक्शन-थ्रिलर चित्रपट सालार पार्ट 1: सीझफायरमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले असून ‘सालार’ ‘केजीएफ युनिव्हर्स’चा एक भाग असल्याचा अंदाज बांधला जात आहे. या चित्रपटात प्रभासबरोबर श्रुती हासन आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच ‘प्रोजेक्ट के’ मध्ये दिसणार आहे. यामध्ये त्याच्याबरोबर अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका आहेत.
 
 “रात्री दारु प्यायची आणि सकाळी देवाची भूमिका करायची?” - विवेक अग्निहोत्री
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0