आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील युवकांना उद्योजकतेसाठी अर्थसाहाय्य करणारे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

    22-Jun-2023
Total Views | 115
Annasaheb Patil Economic Backward Development Corporation

राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्छिणार्‍या, तसेच तशी क्षमता असणार्‍या बेरोजगार तरुणांना आर्थिक साहाय्य पुरविण्यासाठी शासनाने ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’ची स्थापना केली आहे. या महामंडळाच्यातर्फे वैयक्तिक ‘कर्ज व्याज परतावा’ व ‘गट कर्ज व्याज परतावा’ योजना राबविण्यात येते. या योजनांची माहिती देणारा लेख...

वैयक्तिक ‘कर्ज व्याज परतावा योजना’ (IRA १)- या योजनेची मर्यादा दहा लाखांहून १५ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. महामंडळामार्फत रु. ४.५ लाखांच्या व्याज मर्यादेत परतावा करण्यात येतो. व्याज परतावा कालावधी जास्तीत-जास्त सात वर्ष व व्याजाचा दर जास्तीत जास्त द.सा.द.शे. १२ टक्के असेल. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी बँकेमार्फत कर्ज घेतलेले असावे व ते कर्ज फक्त व्यवसायिक तथा उद्योगाच्या दृष्टीने मंजूर झालेले असावे. (दि. २० मे, २०२२ पूर्वीच्या ङज.ख. धारकांना नियमानुसार रु. दहा लाखांच्या मर्यादेतील व्याज परतावा करण्यात येणार असून व्याजाकरिता रु. तीन लाखांची मर्यादा असेल.)

गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना (IRA २)

या योजनेअंतर्गत किमान दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींच्या गटाने एकत्र येऊन, दोन व्यक्तींसाठी कमाल रु. २५ लाखांच्या मर्यादेवर, तीन व्यक्तींसाठी रु. ३५ लाखांच्या मर्यादेवर, चार व्यक्तींसाठी रु. ४५ लाखांच्या मर्यादेवर व पाच व पाच पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास रु. ५० लाखांपर्यंतच्या व्यवसाय/उद्योग कर्जावर पाच वर्षांपर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते, जास्तीत जास्त १२ टक्के व्याज किंवा रु. १५ लाखांच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास, हफ्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम गटाच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. या योजनेमध्ये ‘एफपीओ’गटांनी त्यांच्या शेतीपूरक व्यवसायाकरिता बँकेमार्फत घेतलेल्या कर्जावरीलदेखील व्याज परतावा नियमानुसार महामंडळ करेल, महामंडळाच्या योजनांची संपूर्ण यंत्रणा व कार्यपद्धती ही ऑनलाईन असून पूर्णपणे पारदर्शक आहे. सदरच्या योजना या लाभार्थीभिमुख असून लाभार्थी जोपर्यंत सर्व माहिती वेब प्रणालीवर (www.udyog.mahaswayam.gov.in.) अपलोडकरीत नाही, तोपर्यंत पुढील कार्यवाही करता येत नाही.

महामंडळाच्या योजनांकरिता सामाईक अटी व शर्ती

उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. या योजना प्रामुख्याने मराठा प्रवर्गाकरिता तथा ज्या प्रवर्गाकरिता स्वतंत्र महामंडळ अस्तित्त्वात नाही, अशांकरिता आहेत. योजनेकरिताची वयोमर्यादेची अट स्त्री-पुरुषांकरिता कमाल ६० वर्षे असेल. लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. आठ लाखांच्या आत असावे. (रु. आठ लाखांच्या मर्यादित असल्याचे तहसीलदाराचे प्रमाणपत्र) किंवा वैयक्तिक ‘आयटीआर’ (पती व पत्नीचे) लाभार्थ्यांने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रात स्थायिक/कार्यरत असलेल्या बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य असेल. दिव्यांग व्यक्तीला योजनेअंतर्गत लाभ घ्यावयाचा असल्यास तो मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. गट कर्ज व्याज परतावा योजना (IRA II)मध्ये कमाल वयोमर्यादेचे बंधन नसेल. ‘गट कर्ज व्याज परतावा योजना’ (IRA II) अंतर्गत भागीदारी संस्था, सहकारी संस्था, बचतगट, ‘एल.एल.पी’, कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट/संस्था लाभास पात्र असतील. महामंडळाच्या योजनांतर्गत फक्त व्यवसाय/उद्योगाकरिता घेतलेल्या कर्जावरील व्याज परतावा करण्यात येईल व या योजनांची अंमलबजावणी तंतोतंत करण्यात येईल.

योजनांचा लाभासाठी कार्यपद्धती

पात्रता प्रमाणपत्र (LOI) करिता महत्त्वाची कागदपत्रे-आधारकार्ड (अपडेटेड मोबाईल क्रमांक व स्वत:च्या ई-मेल आयडी सह) रहिवासी पुरावा (रहिवासी दाखला/लाईट बिल/रेशनकार्ड/गॅस बिल/बँक पासबुक) उत्पन्नाचा पुरावा (उत्पन्नाचा दाखला/आयटी रिटर्न (जर लग्न झाले असल्यास नवरा-बायकोचे व लग्न झाले नसल्यास स्वतःचे आयटी रिटर्न अनिवार्य) जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला एक पानी प्रकल्प अहवाल (याचा नमुना वेब प्रणालीवर उपलब्ध आहे.) पात्रता प्रमाणपत्र (LOI) प्राप्त झाल्यानंतरच, ङजख समवेत लाभार्थ्यांने त्याला करावयाचा असलेल्या व्यवसायाचा/उद्योगाचा प्रकल्प अहवाल (आवश्यक ते सर्व कागदपत्र च्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही बँकेमध्ये कर्ज प्रकरण दाखल करावे. कर्ज मंजुरीची पूर्ण प्रक्रिया बँक करीत असते, यामध्ये महामंडळ कोणत्याही स्वरुपाचा हस्तक्षेपकरीत नाही. कर्ज प्रकरण दाखल केल्यानंतर पोचपावती बँकेकडून घ्यावी.

बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर कर्जमंजुरीबाबतची आवश्यक सर्व माहिती संबंधिताने वेब प्रणालीवर सादर करावी. (उदा. ज्या खात्यामध्ये व्याज परतावा हवा आहे त्याचा तपशील, बँक कर्जमंजुरी पत्र, बँकेमार्फत वितरित करण्यात आलेल्या कर्जाचा पुरावा (बँक स्टेटमेंट), बँक ‘इएमआय’ वेळापत्रक (त्यावर वसुलीचा दिनांक असणे अनिवार्य), प्रकल्प अहवाल, हफ्ता भरल्याबाबतचा पुरावा (बँक स्टेटमेंट सही व शिक्क्यानिशी) त्यानंतर बँकेमध्ये पूर्ण ‘इएमआय’ हफ्ता विहित कालमर्यादित भरल्यानंतरच महामंडळाच्या वेब प्रणालीवरऑनलाईन क्लेम दाखल करावा. दाखल केलेला क्लेम अचूक असला तरच संबंधिताला व्याज परताव्याचा लाभ देता येईल. यामध्ये हफ्ता भरल्याबाबतचा पुरावा म्हणून बँक स्टेटमेंट, सही व शिक्क्यानिशी अपलोड करणे अनिवार्य असेल. लाभार्थ्याने दाखल केलेल्या क्लेमची पडताळणी महामंडळामार्फत करण्यात येऊन, लाभार्थ्यास अनुज्ञेयअसलेली व्याज परताव्याची रक्कम संबंधिताच्या बँक खात्यात ऑनलाईन स्वरुपात वितरित करण्यात येईल.

या योजनांच्या लाभाकरिता कोणत्याही सहकार्याची आवश्यकता असल्यास महामंडळाच्या जिल्हा समन्वयकांना संपर्क साधावा. जिल्हा समन्वयकांचा संपर्क वेब प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या योजनांच्या साहाय्याकरिता महामंडळाचे मुंबई मुख्यालय व जिल्हानिहाय जिल्हा समन्वयकांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे कोणत्याही खासगी व्यक्ती/संस्थेच्या प्रलोभनाला बळी पडू नये.

(अधिक माहितीसाठी संपर्क - महामंडळाच्या कार्यालयाचा पत्ता-जी. टी. हॉस्पिटल, बी. टी. मार्ग, जे. जे. स्कूल ऑफ आर्टसच्या मागे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनजवळ, मुंबई ४००००५
दूरध्वनी क्रमांक ०२२-२२६७०४०२, : www.udyog.mahaswayam.gov.in)

(संकलन : जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, सातारा)
(www.udyog.mahaswayam.gov.in.)
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121