ठाकरेंनी आपल्या वाचाळविरांवर आवर घालावा : अमोल मिटकरी

    22-May-2023
Total Views |
Amol Mitkari on Uddhav Thackeray

मुंबई : कर्नाटकात भाजपचा पराभव केल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीत उत्साहाचे वातावरण आहे. मात्र दुसरीकडे मविआमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे राष्ट्रवादीवर सातत्याने आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी सुषमा अंधारेंसह उद्धव ठाकरेंना इशारा दिलेला आहे. मिटकरी म्हणाले की, उद्धवजी मी तुमचा आदर करतो.पंरतू आपल्या पक्षातील वाचाळविरांना आवर घालावा. अन्यथा गल्लीतील टुकार "दादाहो "राष्ट्रवादी पक्षाबद्दल बोलत असतील तर आम्हालाही व्हिडीओ लावावे लागतील, असा इशाराच मिटकरींनी दिला आहे.
 
दरम्यान राऊतांनी ही अजित पवारांवर टीका केली होती.त्यामुळे मिटकरींनी सुषमा अंधारेंसह संजय राऊतांकडून राष्ट्रवादीवर केल्या जाणाऱ्या टीकेवरुन आमदार अमोल मिटकरी यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.