भाजपच्या 'मिशन बारामती'चा पवारांना मोठा धक्का!

पुंरदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

    16-May-2023
Total Views |
ashok-devakate-ex-ncp-mla-of-purandar-may-be-join-bjp


पुणे
: भाजपचे मिशन बारामती यशस्वी होताना पाहायाला मिळत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवारांचे निकवर्तीय मानले जाणारे पुरंदर-हवेलीचे प्रभावशाली माजी आमदार अशोक टेकवडेंनी मुलगा अजिंक्य टेकवडे यांच्यासह राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. त्यांनी आता भाजपाचा हात धरला आहे.टेकवडे यांच्यासोबत एक मोठा गट भाजपात जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या हा निर्णय पुंरदरमध्ये राष्ट्रवादीला धक्का मानला जात आहे. ते जे.पी.नड्डा ,फडणवीसांच्या उपस्थित भाजपात प्रवेश करणार आहेत.

अशोक टेकवडे हे गेल्या काही दिवसापासून पुरंदरमधील राष्ट्रवादीच्या स्थानिक पक्षीय राजकारणावर नाराज होते. त्यानंतर त्यांनी या संदर्भात वरिष्ठ नेत्याकडे अनेकदा तक्रार केली होती. मात्र, त्यांच्या या तक्रारीची कोणतीही दखल घेतली गेली नाही. याशिवाय अशोक टेकवडे यांचा मुलगा सरपंच होऊ नये म्हणून स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच कुरघोडी केली होती. यामुळे देखील टेकवडे नाराज असल्याचे बोलले जात आहे.