मुंबई : भारतीय नौदलाचे एक आडव्हांस लाइट हेलिकॉप्टर बुधवारी (दि. ८) नियमीत उड्डाणादरम्यान सकाळी मुंबई किनार्याजवळ कोसळले. तात्काळ शोध आणि बचावामुळे नौदलाच्या गस्ती जहाजाने हेलिकॉप्टरमधील तीन क्रू सदस्यांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान भारतीय नौदलाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.