मोदींना संपवण्यासाठी काँग्रेसचा कट

केंद्रीय मंत्र्याचा धक्कादायक आरोप

    14-Mar-2023
Total Views |
minister-giriraj-singh-made-serious-accusation-against-congress-over-pm-modi

नवी दिल्ली : काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमध्ये गेले होते, तेव्हा त्यांना एका उड्डाणपुलावर थांबवण्यात आले आणि मोदींना मारण्याची सर्व तयारी करण्यात आली होती, असा आरोप केंद्रिय मंत्री गिरीराज सिंह यांनी केला आहे.

पंजाबमधील पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींचा दाखला देत गिरीराज सिंह म्हणाले, काँग्रेसकडे आता कोणताच मुद्दा नाही, म्हणून अदानींचा मुद्दा लावून धरला आहे. काँग्रेसला वारंवार मोदींना शिव्या द्याव्या लागत आहेत. आता हे लोक मोदी नष्ट होतील, तरच हे सरकार संपेल, असे म्हणत आहेत.

राहुल गांधींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारताचा अपमान केला आहे. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी गिरीराज सिंह यांनी केली आहे. राहुल गांधींनी लंडनला जाऊन भारताचा, लोकशाहीचा आणि भारतीय संसदेचा अपमान केला आहे. संसदेच्या या अधिवेशनात त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडं राहुल गांधींवर कारवाईची मागणी केली आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.