लव्ह जिहाद नाही म्हणणाऱ्या अबू आझमींना नितेश राणेंनी खडसावले!

    14-Mar-2023
Total Views |
bjp-nitesh-rane-samajwadi-party-abu-azmi-word-fight-over-love-jihad-outside-vidhan-bhavan


मुंबई
: भाजप आमदार नितेश राणे आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींमध्ये लव्ह जिहादवरून विधानभवनाच्या बाहेर जोरदार खडाजंगी झाली आहे. दोन्ही नेते आमने-सामने आले असता दोघांमध्ये शाब्दिक चकमक झालेला पाहायला मिळले. लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन दोन्ही नेत्यांनी एकमेकांना सुनावलं.

विधानभनबाहेर प्रसारमाध्यमांसोर बोलताना नितेश राणे यांनी मदरसा अनधिकृतपणे उभारलं जात असल्याचा मुद्दा मांडला. ग्रीन झोनमध्ये मदरसा उभारले जात आहे अशी तक्रार नितेश राणे यांनी अबू आझमी यांच्याकडे केली. त्यावर बोलताना अबू आझमी यांनी कोणत्याही धर्माचं असलं तरी अनधिकृत बांधकाम तोडलं पाहिजे असं मत मांडलं. यावर कारवाई करायला गेल्यावर हत्यारं काढली जातात, तुम्ही माझ्यासोबत चला दाखवतो असं आव्हानच नितेश राणे यांनी अबू आझमींना दिले. यावर बोलताना हे खोटं असून, मी कधीही तुमच्यासोबत येऊ शकतो, असे वक्तव्य अबू आझमी यांनी केले.

हे सगळे प्रकरण सुरू असताना नितेश राणे यांनी लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला.तुम्हालाही लव्ह जिहाद असतं हे मान्य करावं लागेल, असे वक्तव्य नितेश राणेंनी केले. त्यावर हे सगळ खोटं आहे. मी तुम्हाला ५० ठिकाणी घेऊन जातो,असं प्रत्युत्तर अबू आझमी यांनी दिले. यावर तुम्ही प्रेमाची भाषा करता, पण इतरांनाही हे शिकवा असं नितेश राणे यावेळी अबू आझमींना म्हणाले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.