बारामतीत पवार विरुद्ध पवार संघर्ष? शरद पवारांनी दिलं उत्तर...

02 Dec 2023 18:01:34

shard ajit
 
पुणे: अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल शुक्रवारी कर्जत येथिल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिंतन सभेत अनेक गौप्यस्फोट केले होते त्याला शरद पवार यांनी प्रतिउत्तर दिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
अजित पवार जे काही बोलले त्यातील अनेक गोष्टी मी पहिल्यांदाच ऐकत आहे असे शरद पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी २००४ लाच भाजप सोबत जाण्याचा विचार झाला होता असा दावा केला होता त्यावर उत्तर देताना "आमचे अनेक लोक वेगवेगळ्या विचारांचे आहेत, आशा प्रकारच्या मागणीवर चर्चा झाली होती. पण ज्या पक्षाबरोबर जाण्याचा विचार होत होता तो विचार आम्हाला मान्य नव्हता" असं म्हटलं आहे.
 
"आमचे विचार भाजपशी सुसंगत नाहीत. आम्ही भाजपमध्ये जाण्यासाठी लोकांकडे मते मागितली नव्हती. त्यामुळे ज्या लोकांनी आपल्याला मतं दिली आहेत त्यांची फसवणूक करणं योग्य नाही. असही ते यावेळी म्हणाले".यावर शरद पवारांना मग शिवसेनेसोबत निवडणूक का लढवली असा प्रश्न विचारण्यात आला तेंव्हा "आमची शिवसेनेबद्दल वेगळी भूमिका होती व आमची भूमिका भाजपविरोधी आहे असे उत्तर दिले".
 
हे ही वाचा :  शिंदेंच्या बनावट मेल आयडीवर पाठवला व्हीप! सुनावणीत खडाजंगी!
 
राष्ट्रवादीचे खासदार असलेल्या बारामती सह चार मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याच कर्जतच्या सभेत अजित पवार यांनी सांगितलं होतं. त्यावर उत्तर देताना. "भारतात लोकशाही आहे त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष आपली भूमिका घेऊन बारामती लोकसभा असेल किंवा आणखी कोणती लोकसभा असेल तेथे लोकांसमोर जाऊ शकतो त्यामुळे अजित पवारांनी बारामतीतून निवडणूक लढवली तरी तक्रार करण्याचं करण नाही" असं म्हटलं आहे.
 
तत्पूर्वी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला आजच्या बैठकीतील चर्चेच्या विषयांबद्दल बोलताना राज्यातील दुष्काळी स्थिती आणि काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेले नुकसान यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे. तरी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांनसाठी वेळ द्यावा यासाठी ही बैठक झाल्याचे सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0