बहुचर्चित प्रभासच्या 'सालार' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

02 Dec 2023 13:25:54

prabhas 
 
मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याचे चाहते आता जगभरात झाले आहेत. प्रभासच्या आगामी प्रत्येक चित्रपटासाठी त्याचे चाहते कायमच आतुर असतात. असाच बहुरचर्चित ‘सालार’ चित्रपट कधी येणार? त्याची पहिली झलक कधी दिसणार याची प्रेक्षक वाट पाहात होते. आता तो क्षण आला असून प्रभासच्या ‘सालार’ चित्रपटाचा ट्रेलर झाला आहे. २२ डिसेंबर रोजी देशभरात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
 
प्रभासचे आधीचे काही चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगलेच आपटले. मात्र, पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी प्रभास ‘केजीएफ’फेम दिग्दर्शन प्रशांत नील सोबत एकत्रित येत सालार चित्रपटातून दोन मित्रांची गोष्ट सांगणार आहे. दोन मित्रांच्या घनिष्ट मैत्रीची आणि खानसारमधील सत्तेच्या गादीसाठी होणाऱ्या संघर्षाची आहे हे या ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे.
 
दरम्यान, ‘सालार’मधील पृथ्वीराजच्या लुकने, प्रभासच्या अॅक्शनने, प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या देखील चित्रपटाच ‘केजीएफ’प्रमाणेच एक मोठे साम्राज्य उभारले असून १००० वर्षांपुर्वी घडलेला इतिहास आणि वर्तमानकाळातील त्याची पाळेमुळे दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केलेला ट्रेलरमधून तरी दिसून येत आहे.
 
आणखी वाचा
 
ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांची पत्नी गायत्री पंडित यांचे निधन  
 
होम्बल फिल्म्स निर्मित, ‘सालार: पार्ट १ सीझफायर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले असून या चित्रपटात प्रभास, श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान, २२ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘सालार’ची टक्कर शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटाशी होणार आहे. त्यामुळे २०२३ या वर्षाचा शेवट फारच मनोरंजित होणार यात काही शंका नाही.
 
 
 
Powered By Sangraha 9.0