ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांची पत्नी गायत्री पंडित यांचे निधन

    02-Dec-2023
Total Views |

gayatri pandit
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांच्या पत्नी गायत्री पंडित यांचे निधन झाले. २८ नोव्हेंबर रोजी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अजून अस्पष्ट असले तरी वयोमानामुळे निधन झाल्याचे सांगितले जात आहे.
राजकुमार यांचे २७ वर्षांपूर्वीच घशाच्या कर्करोगामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर तीन मुलांसह गायत्री मुंबईतच वास्तव्यास होत्या. राजकुमार आणि गायत्री यांना पारू राज कुमार, पाणिनी राज कुमार आणि मुलगी वास्तविकता पंडित अशी तीन मुले आहेत.
काश्मिरी पंडित कुटुंबात जन्मलेल्या राजकुमार यांचे खरे नाव कुलभूषण पंडित होते. सब-इन्स्पेक्टरची नोकरी सोडून ते अभिनय क्षेत्राकडे वळले. 'मदर इंडिया', 'सौदागर', 'तिरंगा', 'मरते दम तक', 'नील कमल', यांसारख्या सुपरहिट चित्रपटांत  त्यांनी उत्तम कामगिरी केली. काही काळानंतर त्यांचेही काही चित्रपट फ्लॉप झाले. अशावेळी ते आपली फी १ लाखाने वाढवत होते. राजकुमार यांनी याबाबत एका मुलाखतीत सांगितले होते की, “जेव्हा माझे चित्रपट फ्लॉप व्हायचे, तेव्हा माझी फीही एक लाखांनी वाढायची. माझ्या सेक्रेटरीने विचारले होते की, राजसाहेबांचा चित्रपट फ्लॉप होता, तुम्ही एक लाख वाढवत आहात का? यावर मी उत्तर दिले होते की, पिक्चर वाजला होता का? नाही, मी नापास झालो नाही, त्यामुळे फीही एक लाख रुपयांनी वाढणार आहे.