जे. जे. रुग्णालयात गोळीबार ते '९३' चा बॉम्बस्फोट; कोण आहे सुत्रधार सलीम कुत्ता ?

    15-Dec-2023
Total Views | 241
salim kutta 
 
मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राईमचा शार्पशूटर ‘सलीम कुत्ता’ हा पेरोलवर तुरुंगाबाहेर असताना उद्धव ठाकरे गटाच्या नाशिक महानगरप्रमुखाने त्याच्यासोबत डान्स पार्टी झाडल्याचा खळबळजनक दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केला. या पार्टीचे फोटो त्यांनी सभागृहात सादर केले, तसेच व्हिडिओपुरावे अध्यक्षांकडे अधिक आकलनासाठी पाठवून दिले. या गंभीर विषयाची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एसआयटी’च्या माध्यमातून तपास करण्याची घोषणा केली.
 
कोण आहे सलीम कुत्ता
१२ जुलै १९९२ रोजी दाऊद इब्राहिमच्या टोळीने अरुण गवळी टोळीतील शैलेश हळदकरची हत्या केली होती. त्यांनी मुंबईतील जेजे रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये घुसून गोळीबार केला होता. दाऊदचा भाऊ इस्माईलच्या हत्येचा बदला घेण्यासाठी या टोळीने जेजे हॉस्पिटलवर हल्ला केला होता. अंडरवर्ल्डने एके-४७ रायफल वापरण्याची ही पहिलीच वेळ होती. 
 
 
या हत्याकांडाचा सलीम कुत्ता मूख्य सुत्रधार होता. सलीम कुत्ता दाऊद इब्राहिम टोळीचा मुख्य शूटर होता. अनेक मोठ्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता. सलीम कुत्ता दाऊदचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या छोटा शकील सोबत गुन्हेगारी कारवाया करायचा. सलीम कुत्ता हा नजीबाबाद परिसरातील कऱ्हेडी गावचा रहिवासी होता पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला की तो नजीबाबाद ला निघून जायचा. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी नजीबाबाद येथे घेराबंदी केली होती पण तो तेव्हा ही निसटला होता.
 
फेब्रुवारी १९९३ मध्ये रायगड जिल्ह्यात दिघी व शेखाडी बंदरात एके ५६ बंदुका व आरडीएक्सचे साठे उतरवण्यात आले होते. त्यानंतर १२ मार्च १९९३ रोजी मुंबईतला शेअर बाजार, सेंच्युरी बाजार, एअर इंडिया इमारत, नायगाव, प्लाझा सिनेमा, विमानतळ प्रवेशद्वार आदी ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. त्यात २५७ जण ठार झाले. याच बॉम्बस्फोट घडवण्याच्या गुन्ह्यामध्ये सलीम कुत्ता जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. शिक्षा भोगत असताना पेरोलवर तुरुंगाबाहेर असताना हा प्रकार घडला.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121