सिलक्यारा बचावकार्यात सहभागींचे नितीन गडकरींनी मानले आभार

29 Nov 2023 17:41:07

nitin gadkari 
नवी दिल्ली: उत्तरकाशीतील निर्माणाधीन सिलक्यारा बोगद्यात गेले १८ दिवस ४१ मजुर अडकले होते. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू होते. अथक प्रयत्नांनंतर मंगळवारी संध्याकाळी सर्व मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. दरम्यान बचावकार्यात सहभागी असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरीकांचे कौतुक करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीं आभार मानले आहेत.
 
हे ही वाचा: ठाकरे-राऊत अडचणीत, गुन्हा दाखल होणार! 
 
नितीन गडकरी म्हणाले, “मला आनंद आहे की सिलक्यारा दुर्घटनेत जे ४१ मजुर अडकले होते ते बाहेर निघाले आहेत व सर्वजण सुखरुप आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या (PMO) मार्गदर्शनाखाली भारत सरकारची सर्व पथके, उत्तराखंड सरकार आणि तेथिल स्थानिक जनता यांच्या अथक परीश्रमामुळेच हे यश मिळाले आहे. हे एक मोठे संकट होते व प्रथमच आपल्याला अशा संकटाचा सामना करावा लागला होता. य़ात बचावलेल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो.”
 
 
हिमालयीन क्षेत्रात काम करणे कठीण आहे, पण ते तितकेच महत्त्वाचे आहे. या दुर्घटनेतून आपण खूप काही शिकलो असून लवकरच बोगद्याचे सेफ्टी ऑडीट करुन जास्त आधुनिक तंत्रज्ञान कसे वापरता येईल य़ावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
 
Powered By Sangraha 9.0