ठाकरे-राऊत अडचणीत, गुन्हा दाखल होणार!

शंभूराज देसाईंचं पत्रकार परिषदेत सूचक वक्तव्य

    29-Nov-2023
Total Views | 205

Thackeray


मुंबई : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावर बोलताना आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभुराज देसाई यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. सत्तेत असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात घेतलेल्या भुमिकेचा त्यांनी यावेळी मोठा खुलासा केला आहे. दरम्यान, त्यांनी ठाकरेंविरोधात कायदेशीर गुन्हा नोंदवण्याचा इशाराही दिल्याचे दिसत आहे.
 
शंभुराज देसाई यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "राज्याच्या प्रमुख पदावर असलेल्या मुख्यमंत्र्याविषयी जर माजी मुख्यमंत्री अशा प्रकारचे वक्तव्य करत असतील, तर नारायण राणेंच्यावेळी त्यांनी जी भुमिका घेतली होती तीच भुमिका घेण्याचा आम्हीदेखील विचार करु. त्याचप्रमाणे या संपुर्ण प्रकणाची ऑडियो आणि व्हिडीओ क्लिप तपासून त्यानंतर पोलिस आणि कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून याबाबतचा विचार करु."
 
ज्याप्रमाणे खासदार संजय राऊत शिंदे गटाविषयी वक्तव्य करत असतात तशाच प्रकारची वक्तव्ये आता उद्धव ठाकरेदेखील करताना दिसत आहेत. यावर शिंदे गटाचे नेतेदेखील आक्रमक भुमिका घेत आहेत. त्यामुळे आता ठाकरे आणि राऊतांकडून करण्यात येणाऱ्या वादग्रस्त विधानांमुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121