महिला व बाल विकास खातं संजय राठोड सांभाळतील : प्रियंका चतुर्वेदी

    09-Aug-2022
Total Views |
 
sr
 
 
मुंबई: माजी वनमंत्री संजय राठोड यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये मंत्रिपदाची शपथ घेताच अनेकांनी टीकेचे बाण त्यांच्यावर सोडले. शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान न मिळाल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
 
 
मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला नेत्याला स्थान दिलं नाही, मग महिला बालकल्याण खातं कोण सांभाळणार?, असा प्रश्न विचारल्यावर क्षणाचाही विलंब न लावता, “संजय राठोड सांभाळतील ना…. त्यांच्यावर नेतृत्वाने एवढा विश्वास दाखवला आहे, म्हटल्यावर महिला बालकल्याण खातं त्यांच्याकडेच द्यायचं असेल”, असा टोला चतुर्वेदी यांनी लगावला.
 
शिवसेनेत यामिनी जाधव, अपक्ष गीता जैन, मंजुळा गावित यांसारख्या महिला होत्या. इतकंच नव्हे तर भाजपकडे पंकजा मुंडे देखील मंत्रिपदासाठी पात्र होत्या. पण तरीही महिलांना स्थान न दिल्यामुळे चतुर्वेदी यांनी माध्यमांसमोर संतप्त भूमिका व्यक्त केली.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.