काय आहे मालवणी पॅटर्न? ज्यामुळे होतोय शिवसेनेवर तुष्टीकरणाचा आरोप!

04 Mar 2022 19:15:26

malavani pattern





मुंबईच्या राजकीय वर्तूळात तुष्टीकरण, लांगूलचालन या शब्दासोबतच मालवणी पॅटर्न हा शब्द आपल्या कानावर आला असेल. पण हा मालवणी पॅटर्न म्हणजे नेमकं आहे तरी काय? भाजप मालवणी पॅटर्न विरोधात इतकी आक्रमक का झाली या संदर्भात जाणून घेऊयात. मुंबईतच्या पश्चिम उपनगरांमध्ये मालवणी हा भाग येतो. दिसायला सर्वसामान्य लोकवस्ती पण तिथली खदखद खुप मोठी आहे.




हेही वाचा :  शिवसेनेतर्फे मुंबईत मालवणी पॅटर्न राबविण्याचा डाव!

एका विशिष्ट समुदायाला खुश करण्यासाठी त्यांना मोकळीक देणे आणि इथल्या स्थानिकांच्या हक्कांची घरे खाली करण्याचे काम मालवणीत सुरू असल्याचा आरोप भाजप आमदार आणि मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी केला आहे. बेकायदा मशिदीविरोधात तक्रार करणाऱ्याला दमदाटी करणे, घर सोडून जाण्यासाठी तिथल्या हिंदू कुटूंबांवर दबाव टाकणे. त्यांच्या मालमत्ता स्वस्तात लाटणे असे प्रकार मालवणीत घडत होते.


हेही वाचा : दाढीकुरवाळू शिवसेना!


या मुद्द्यावरुन भाजपतर्फे मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली होती. 'शिवसेनेला केवळ मुस्लिम समाजाच्या तुष्टीकरणासाठी संपूर्ण मुंबईमध्ये मुस्लिम वस्त्यांच्या वाढीसाठी प्रोत्साहन द्यायचे आहे. आताच्या शिवसेनेला मुस्लिम मतांची हाव आहे आणि यातूनच ते हिंदू समाजाचा गळा दाबण्याचे प्रयत्न सुरु आहेत.', असे आरोप लोढा यांनी केला आहे. या प्रकाराची तुलना काश्मिरी पंडितांवरील अन्यायाशी केली आहे. असेच काहीसे प्रकार मुंबईतील इतर ठिकाणीही होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


हेही वाचा : 'मालवणी पॅटर्न'विरोधात लोढांची डरकाळी !


भायखळ्यातील आग्रीपाडा परिसरात प्रस्तावित असलेल्या उर्दू भाषा शिक्षण केंद्राच्या उभारणीवरून वाद निर्माण झाला होता. घटनास्थळी भेट दिल्यानंतर लोढा यांनी याच मुद्द्याचा पुनरुच्चार केला होता. आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षित होती. मात्र राजकीय हेतूसाठी आणि अल्पसंख्यांच्या तुष्टीकरणासाठी स्थानिक नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी काही महापालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून या ठिकाणी उर्दू भाषा शिक्षण केंद्राची उभारणी करण्याचा घाट घातला आहे. मुळात उर्दूसाठी कधी प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली जाऊ शकत नाही, त्यामुळे स्थानिक नागरिक हे भवन या ठिकाणी उभारू देणार नाहीत, अशी भूमिका लोढा यांनी घेतली होती. या शिवाय विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासह संपूर्ण भाजप या विरोधात वेळोवेळी उभी राहिल, असे ते म्हणाले.

अवैध मशिदीविरोधात तक्रार करणाऱ्याला दमदाटी, घर सोडून जाण्यासाठी हिंदूंवर दबाव, हिंदूंच्या मालमत्ता स्वस्तात लाटणे, अशा झुंडशाही विरोधात सातत्याने दैनिक 'मुंबई तरुण भारत' व 'महाMTB'तर्फे वार्तांकनही केले आहे. मालवणीत काही अशा घटना घडल्या. साधारणपणे ५-६ वर्षांपूर्वी या भागातील छेडा नगरमध्ये १६० कुटुंब वास्तव्यास होती. आताही तेवढीच कुटुंब आहेत. मात्र, यामध्ये आता फक्त ६० हिंदू कुटुंब उरली आहेत. बाहेरुन आलेल्या बांग्लादेशींची वस्ती वाढवून स्वतःची वोट बँक तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप लोढा मालवणी पॅटर्नबद्दलच्या प्रत्येक भाषणात करतात.


मालवणी पॅटर्न विरोधातील मंगल प्रभात लोढा यांचे विधान सभेतील भाषण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हिंदूंच्या श्री राम मंदिराला समर्थन देणाऱ्या रामभक्तांचे पोस्टर्स मालवणीतील पोलीसांनीच फाडून टाकले. महाराष्ट्रात इतर ठिकाणी काहीही झालं तरीही एफआयआर होत नाही. परंतू, मालवणीत रामभक्तांच्या विरोधात एफआयआर दाखल होते. वेळेत याकडे लक्ष दिले नाही, तर ज्या प्रकारे काश्मिरी पंडितांना घर सोडून जावे लागले तशीच स्थिती महाराष्ट्रातील मालवणीत येईल.


तुम्ही पाच-पाच वर्षांची मतदार यादी काढून पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल. एकूण १५ हजार हिंदू मतदार याद्यांमधून गायब आहेत. बाहेरुन आलेले बांग्लादेशी मतदारांची संख्या १२ हजारांनी वाढली. हे एका रात्री घडलेले नाही. बांग्लादेशातून माणसं आणली जातात. ड्रग्जच्या धंद्यात त्यांना हाताशी घेतले जाते. सरकारी जमिनींवर त्यांना अतिक्रमण करू दिले जाते., असे भाषण त्यांनी विधानसभेत दि. ४ मार्च २०२१ रोजी केले होते.




Powered By Sangraha 9.0