नग्नावस्थेत तरुणाला मारहाण झाल्यानंतरही मानवतावादी याप्रकरणी गप्प का?

24 Jul 2021 11:15:48


kurar malad_1  


‘कॅम्पा कोला’ आणि ‘पुष्पा पार्क’ला वेगळा न्याय का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर द्या; स्थानिकांचा प्रशासनाविरोधात रोष कायम

मुंबई :  मालाड पूर्वेकडील ‘पुष्पा पार्क’ मेट्रो स्थानकाच्या कामात अडथळा ठरणार्‍या ‘हवा हिरा पार्क’मधील ५७ घरांवर प्रशासनाकडून नुकतीच कारवाई करण्यात आल्यानंतर स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाचे वातावरण आहे.
 
 
“वरळी येथील ‘कॅम्पा कोला’साठी वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय का,” असा सवाल येथील नागरिक विचारत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी उत्तर द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. तरुणाला पोलिसांकडून नग्नावस्थेत मारहाण झाल्याच्या आरोपांनंतरही मानवतावादी आणि तथाकथित पुरोगामी गप्प का असा सवाल येथील स्थानिक विचारत आहेत.
 
 
‘पुष्पा पार्क’ मेट्रो स्थानकाच्या कामासाठी ‘हवा हिरा पार्क’ येथील ५७ घरांना महानगरपालिकेने नोटीस बजावल्या होत्या. अत्यंत दडपशाही करत इथल्या लोकांना नोटिसा बजावण्यात आल्या. काही लोकांना बदल्यात चांदिवली, अप्पापाडा अगदी गोवंडीलाही जागाही देेऊ केली. मात्र, प्रत्यक्षात ५० फुटाची जागा असणार्‍याला १५ फूट जागा देण्याचा प्रयत्न झाला, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.
 
 
 
 
 
 
मुंंबई भाजपचे प्रभारी आणि कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी याप्रकरणी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना सांगितले की, “अशीच समस्या बाणडोंगरी मेट्रो प्रकल्पासाठीही आली होती. त्यावेळी मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा विषय मांडला. त्यांनी लोकहिताचा निर्णय घेतला आणि लोकांना जवळच्याच परिसरात घरे मिळाली,” असे त्यांनी सांगितले.
 
काही वर्षांपूर्वी वरळीमधील ‘कॅम्पा कोला कंपाऊंड’च्या रहिवाशांच्या बाबतीतही असेच घडले होते. मात्र, त्यावेळी तेथील लोकांना कायदेशीर दिलासा मिळाला होता. मग आता हाच न्याय ‘हवा हिरा पार्क’च्या ५७ कुटुंबासाठी का नाही? सध्याचे मुख्यमंत्री ठाकरे इथल्या लोकहितासाठी का पुढे येत नाहीत? असा येथील स्थानिकांचा सवाल आहे.
 
 वाचा आमचा अग्रलेख :- 
 
ठाकरेंची मस्ती उतरेलच!
 
 
येथील नगरसेविका दक्षा पटेल यांनी याबाबत बोलताना सांगितले की, “महानगरपालिकेने नोटीस दिली, पण ‘एमएमआरडीए’कडून एकही नोटीस या नागरिकांना मिळालेली नाही, असे त्यांनी सांगितले. कारवाई झालेल्या घरातील रडणार्‍या भेकणार्‍या नग्ण तरूणाचा पोलीस व्हॅनमधला व्हिडिओ समाजमन अस्वस्थ करत आहे. याप्रकरणी आम्हाला आता काही म्हणायचे नाही. आमची कुणाबद्दलही तक्रार नाही, असे या तरुणाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. ते काहीही म्हणोत, पण ज्यांच्या संवेदना जागृत आहेत. त्यांना विवशता नक्कीच जाणवेल.
 
 
 
 
 
 
या कुटुंबाचे सांत्वन करायला ना कुणी निधर्मी आले ना पुरोगामी ना मानवी हक्कवाले आले
 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लवकरात लवकर ‘पुष्पा पार्क’ मेट्रो स्थानकाचे उद्घाटन करायचे आहे. त्यामध्ये ही ५७  घरे येतात. त्यामुळे येथे क्रूर कारवाई करण्यात आली का? मराठी अस्मिता म्हणत राजकारण करणारे राज्य सरकार, प्रशासन येथील मराठी कुटुंबाशी असे का वागले? भारतीय नागरिक म्हणून घटनेने लागू केलेले कायदे, हक्क यांच्यासाठी नाहीत का? मराठी अस्मिता राजकारण करतानाच मराठी कुटुंबे उद्ध्वस्त करण्याचा डाव का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर द्या, असा संताप येथील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
 

 
Powered By Sangraha 9.0