उलगडा महाराष्ट्रातील 'गोबी' माशांचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2021   
Total Views |

 

gobi fish _1  H

 


‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या (बीएनएचएस) ‘फ्रेश वॉटर रिसर्च’ विभागातील शास्त्रज्ञांनी वन विभागाच्या ‘मँग्रोव्ह फाऊंडेशन’च्या आर्थिक साहाय्याने महाराष्ट्राच्या किनारीपट्टी क्षेत्रात आढळणार्‍या ‘गोबी’ या मत्स्यप्रजातीचा अभ्यास केला. या संशोधनकार्यातून उलगडलेल्या काही तथ्यांवर टाकलेला हा प्रकाश...

 


गोबीडी

जगभरात उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण वातावरणात ’गोबी-डी’ वर्गातील मत्स्यप्रजातींचा आढळता आहे. आकारशास्त्र, इकोलॉजी आणि वर्तनशास्त्राच्या अनुषंगाने ’गोबी-ड’ वर्गातील माशांमध्ये वैविध्यता आढळते. जगात आढळणार्‍या मत्स्यप्रजातींमधील ३५ टक्के प्रजाती आणि पृष्ठवंशीय प्राण्यांमधील २० टक्के प्रजाती या एकट्या ’गोबीडी’ वर्गातील आहेत. ’गोबी’ माशांच्या साधारण दोन हजार प्रजाती ज्ञात आहेत. जलीय परिसंस्थेतील गोड्या आणि खार्‍या अशा दोन्ही पाण्यांमध्ये या माशांचा अधिवास आहे. खासकरून कांदळवन, खाडी पट्टे आणि ज्याठिकाणी गोडे पाणी समुद्रातील खाऱ्या पाण्याला येऊन मिळते अशा जागांमध्ये ’गोबी’ माशांची विविधता आढळून येते. या माशांमधील प्रजातींचा आकार साधारण ३० सेंटिमीटरपासून एक फुटांपर्यंत असतो. मात्र, यातील बहुतांश प्रजाती या लहानच असतात. छोटे जीवजंतू खाऊन हे मासे गुजराण करतात.

 
महाराष्ट्रातील गोबी

भारताच्या किनारपट्टीवर खार्या आणि गोड्या माशांच्या प्रजातींवर बर्‍यापैकी संशोधन झालेले आहे. मात्र, ’गोबी’ माशांच्या प्रजातींचा वैज्ञानिक अनुषंगाने संशोधन झालेले नाही. त्यामुळे या माशांच्या प्रजातींविषयी फारच अपुरी माहिती उपलब्ध आहे. १९२८ आणि १९७३ या दोनच वर्षी ‘गोबी’ माशांवर शोधकार्य झाल्याचे दिसून येते. त्यामुळे या माशांच्या प्रजातींविषयी अनभिज्ञता आहे. शिवाय या प्रजातींसाठी आवश्यक असणारा अधिवासही मानवनिर्मिती कारणांमुळे नष्ट होत आहे. म्हणूनच ’बीएनएचएस’चे शास्त्रज्ञ उन्मेश कटवटे आणि शुभम यादव हे राज्यात आढळणार्‍या ’गोबी’ माशांविषयी शास्त्रीयरित्या शोधकार्य करत आहेत. या प्रजातींविषयी सखोल अभ्यास करण्याचा हेतू त्यांच्या संशोधनकार्यामागे आहे.

gobi fish _1  H 
 
अभ्यासकार्य

दि.१ जानेवारी ते ३१ डिसेंबर, २०२० या कालावधीत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा अभ्यास पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे संशोधकांना केवळ मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्येच संशोधनाची संधी मिळाली. या तीन जिल्ह्यांमधील कांदळवने, खाड्या, पाणथळ आणि ज्याठिकाणी गोडे पाणी खार्‍या पाण्याला येऊन मिळते असे परिसर संशोधकांनी पालथे घातले. यादरम्यान मिळालेल्या प्रजातींचे आकारशास्त्र, अस्थिकलशास्त्र आणि जनुकीय (डीएनए) पद्धतींचा वापर करून वर्गीकरण करण्यात आले. येत्या वर्षभरात हा अभ्यास रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही करण्यात येणार आहे.
 

gobi fish _1  H 
 

संशोधनातील तथ्य
 
शोधकार्यामधून संशोधकांनी ओळख पटवून १८ प्रजातींची नोंद केली आहे. त्यामधील जवळपास आठ ते नऊ प्रजातींची ओळख पटलेली नाही. याशिवाय ’गोबी’च्या अधिवासातील ४४ सहयोगी मत्स्यप्रजातींची नोंद करण्यात आली आहे. नोंद केलेल्या १८ प्रजातींपैकी सात प्रजाती या प्रथमच भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सापडल्या आहेत. तर तीन प्रजातींची भारतीय किनारपट्टीवरुन प्रथमच नोंद करण्यात आली असून तीन ते चार प्रजाती या विज्ञानाकरिता नवीन असल्याची शक्यता आहे. याशिवाय भारतात अधिवास नसणार्‍या चार परदेशी प्रजाती संशोधकांना शोधकार्यादरम्यान आढळून आल्या. अशा परदेशी प्रजाती स्थानिक जैवविविधतेकरिता हानिकारक आहेत.

 
gobi fish _1  H 


अधिवास संकटात

कांदळवनांमध्ये ज्याठिकाणी गोड्या पाण्याचे स्रोत येऊन मिळतात तो परिसर ’गोबी’ माशांकरिता उत्तम अधिवास आहे. मात्र, कांदळवनांमधील हेच गोड्या पाण्याचे स्त्रोत वाढते शहरीकरण आणि भरावामुळे नष्ट होत आहेत. अशा नष्ट झालेल्या ठिकाणी संशोधकांना शोधकार्यादरम्यान ’गोबी’ मासे आढळून आले नाहीत. याशिवाय वाळू उत्खनन, सांडपाणी, कांदळवनांची तोड, गाळ उपसा यांमुळे या माशांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे.

 
उपाययोजना/ सूचना

१) ’गोबी’ माशांच्या अपुर्‍या माहितीमुळे या मत्स्यप्रजातींवर सखोल आणि पद्धतशीर अभ्यास आवश्यक.
 
२) राज्यात गोबीडी वर्गातून नव्या प्रजातींची उलगडा होण्याची दाट शक्यता असल्याने वर्गीकरणाचा अभ्यास महत्त्वाचा .
 
३) गोबीमत्स्यप्रजातींच्या संवर्धनासाठी दीर्घकालीन संशोधन आणि धोरणात्मक अंमलबजावणी.
 
४) कांदळवनांना येऊन मिळणार्या गोड्या पाण्याच्या स्रोतांचे संवर्धन गरजेचे.

५) ग्रामीण आणि मच्छीमारांच्या रोजगारावर परिणाम होऊ नये म्हणून बेकायदेशीर सोडले जाणारे औद्योगिक आणि शहरी सांडपाण्यावर नियंत्रण मिळवणे.

६) परदेशी प्रजातींवर नियंत्रण मिळवण्यासाठी भागधारकांना मार्गदर्शन करणे. मार्गदर्शन करणे. 

@@AUTHORINFO_V1@@