तो आवाज संजय राठोडचाच - चित्रा वाघ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Feb-2021   
Total Views |
chitra wagh _1  


मुंबई -
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ हल्लाबोल केला आहे. पूजाच्या आत्महत्येनंतर व्हायरल झालेल्या आॅडियो क्लिप मधील आवाड संजय राठोड यांच्याच असल्याचा दावा वाघ यांनी केला आहे.
 
 
 
काही वेळापूर्वीच बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरागडावर संजय राठोड पोहोचले आहेत. पंधरा दिवस गायब असलेले संजय राठोड आज सर्मथकांसमोर आले. पोहरागडावर पोहोचलेल्या राठोडांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थक शक्तीप्रदर्शन करत आहेत. यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोडांवर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की, "आरोपीला कोणतीही जात आणि धर्म नसतो. पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर व्हायरल झालेल्या आॅडिया क्लिपमधील आवाज हा संजय राठोड यांचाच आहे. अशावेळी पुणे पोलीस त्यांची चौकशी का करत नाहीत ? शिवाय पूजासोबत राहणाऱ्या दोन तरुणांना अजूनही पोलीसांनी ताब्यात घेतलेले नाही. त्यांची केवळ जुजबी चौकशी करण्यात आली आहे."
 
@@AUTHORINFO_V1@@