"वांद्रे वंडरलँड" नावाखाली ख्रिसमसचा जल्लोष

तेजिंदरसिंह तिवाना यांचा शिवसेनेवर निशाणा

    दिनांक  29-Dec-2021 11:13:08   
|
 
1 _1
 
 
 
मुंबई : 'छठपूजा, गणपती विसर्जन, दीपावली या दिवशी कोरोनाच्या नावाखाली मुंबईकरांवर निर्बंध लादणारी शिवसेना आता "वांद्रे वंडरलँडच्या" नावाने ख्रिसमस आणि नववर्ष साजरे करत आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराचा धोका मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. महापालिका प्रशासन आणि ठाकरे सरकार सर्वसामान्य मुंबईकरांसाठी दररोज नवनवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करत आहेत, घरी जमणाऱ्या लोकांच्या संख्येवरही आदेश जारी केले जात आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे मुंबईकरांना वांद्रे येथील या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आमंत्रित करत आहेत. मात्र "वांद्रे वंडरलँड" नावाखाली सुरु असलेला त्यांचा हा ख्रिसमसचा जल्लोष लोकांच्या जीवावर नेतु नये,' अशी भूमिका मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांनी मांडली आहे. मंगळवार, दि. २८ डिसेंबर रोजी त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 
 
 
तेजिंदरसिंह तिवाना म्हणाले की, 'वांद्रे येथे सुमारे लाखभर लोकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमांमध्ये महापालिकेतर्फे घालून देण्यात आलेल्या नियमांची राजरोसपणे पायमल्ली झाली आहे. त्यामुळे या संबंधित आयोजकांवर प्रशासनाने कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. मुंबईत सध्या रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू आहे. मात्र, वांद्रे वंडरलँड हा कार्यक्रम नेत्रदीपक रोषणाई आणि विविध प्रकाशयोजनेसाठी आहे, आणि हा कार्यक्रम केवळ रात्रीच आयोजित केला जाऊन शकतो. एकीकडे महापालिकेने मुंबईकरांनी रात्री बाहेर पडू नये म्हणून संचारबंदी लावली आहे. पण दुसरीकडे युवासेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे हे मुंबईकरांना त्या ठिकाणी जमण्याचे आवाहन करत आहेत. त्यामुळे पालिका आदेश देता असूनही आदित्य ठाकरे मुंबईकरांना तिथे जमण्याचे आमंत्रण का देत आहेत ?' असा सवाल तिवाना यांनी यावेळी विचारला.
 


 
संजय राऊतांनी ओमायक्रॉनसोबत युती तर केली नाही ना ?


'वांद्रे येथे आयोजित करण्यात आलेल्या 'वांद्रे वंडरलँड' हा कार्यक्रम कुणाच्या नजरेत येऊन नये म्हणून खा. संजय राऊत यांनी ओमायक्रॉनशी काही युती तर केली नाही ना ? की शिवसेनेने इथेही वसुलीचे काही नवीन मॉडेल विचारात घेतले आहे ? ' याचा खुलासा होणे आवश्यक आहे.' असे त्यांनी म्हटले आहे. 
 
ही मोठी चूक ठरू नये


'मुंबईत मॉल्स, मल्टिप्लेक्स, रेस्टॉरंट आणि विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनासाठी लसीकरण, मास्क आणि आरटीपीसीआर यांसारख्या कडक कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात आहे, परंतु वांद्रे वंडरलँडसाठी सर्व नियमांची सर्रासपणे पायमल्ली करण्यात आली आहे. आज महाराष्ट्र ओमायक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे घेऊन पहिल्या क्रमांकावर बसला आहे, अशा स्थितीत विचार न करता, वाहतूक नियोजन न करता आणि सुरक्षा व्यवस्था आणि योग्य माहिती न देता असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. असा प्रकार मुंबईकरांसाठी वंडर लँड ठरू शकत नाही, परंतु असे कार्यक्रम वारंवार आयोजित केले गेले, तर येणार्‍या काळात ती निश्चितच मोठी चूक ठरू शकेल.' अशी भीती देखील तिवाना यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
 
 

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.