मुंबईत १८४ कोरोनाबाधितांची नोंद ;

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Nov-2021   
Total Views |
 
corona_1  H x W
 
 
 
मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार सोमवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी मुंबई शहरात १८४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर २२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ७,३८,१५५ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे.
 
 
 
सोमवारी मुंबईत ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २,७७५ इतकी आहे. रुग्ण दुपटीचा दर २०१० दिवसांवर जाऊन ठेपला आहे. शहरातील एकूण १५ इमारतींना महापालिका प्रशासनातर्फे सील करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
 
 
मुंबईत झालेल्या एकूण चाचण्या - १,१९,२७,७६९
१५ नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या चाचण्या - २३,७२३
@@AUTHORINFO_V1@@