वाद चीन आणि ऑस्ट्रिलियाचा फायदा भारताचा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2021
Total Views |

modi 2_1  H x W


नवी दिल्ली : कोळश्याच्या अभावामुळे सर्वच देशांना ऊर्जा संकटांचा सामना करावा लागत आहे. कोळशाच्या अभावामुळे सर्व देश चिंतित आहेत. त्यात चीन हा देश एकटा जगातील ५६ टक्के कोळशाची आयात करतो, त्यामुळे याचा सर्वात मोठा फटका चीन आणि त्यानंतर भारतास बसण्याची शक्यता आहे. भारतही कोळशाच्या आयातीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगातील ११ टक्के कोळसा भारत आयात करतो. त्यामुळे या दोन्ही देशांना कोळशाच्या अभावी ऊर्जा संकटाचा सामना करावा लागणार आहे. तरी यातून भारताने मुत्सद्देगिरीने मार्ग काढला आहे.

ऑस्ट्रेलिया हा कोळशाचा मोठा निर्यातदार आहे आणि चीन हा ऑस्ट्रेलियाचा एक मोठा ग्राहक होता. परंतु, गेले काही महिने ऑस्ट्रेलिया आणि चीनचे बिघडलेले आंतरराष्ट्रीय संबंध भारतासाठी उपयोगाचे ठरणार आहेत. या दोन्ही देशांचे संबंध बिघडण्याचे मुख्य कारण 'ऑकस' ची निर्मिती सांगितले जाते. या बिघडलेल्या संबंधामुळे चीनने गेले महिनाभर ऑस्ट्रेलियाच्या मालावर निर्बंध टाकल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा दोन दशलक्ष टन कोळसा चीनच्या बंदरावर पडून आहे. भारत ही संधी साधत आहे. चीनच्या बंदरावरून भारत हाच कोळसा मूळ भावापेक्षा कमी किंमतीत विकत घेत आहेत. ऑस्ट्रेलियाचा कोळसा हा सर्वात उत्तम दर्जाचा आणि त्यामुळे सर्वात महागही मानला जातो. परंतु, कोरोना आणि चीनचे निर्बंध यामुळे ऑस्ट्रेलियाच्या कोळशाची किंमत ढासळली आहे. चीन आणि ऑस्ट्रेलियाच्या या दुहीचा फायदा घेत भारत आपल्या कोळशाच्या टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे.




@@AUTHORINFO_V1@@