वर्क फ्रॉम होम असल्याने वीज बिलं अधिक : ऊर्जामंत्री नितीन राऊत

24 Jul 2020 16:20:37

nitin Raut_1  H


 

मुंबई : राज्यात गेल्या तीन महिन्यांत 'वर्क फ्रॉम होम' झाल्यामुळेच विजबिल जास्त आले आहेत, असा पुर्नरुच्चार राज्याचे उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केला आहे. लॉकडाऊनमुळे विद्यार्थी शाळा-कॉलेजमध्ये गेले नाहीत, कर्मचारी कामावर गेले नाहीत, तसेच सर्वजण घरातच असल्याकारणानेच पंखे, टिव्ही आणि इतर वस्तूंचा जास्त वापर झाला, त्यामुळे विजबिल जास्त येत आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे. वाढीव विजबिलाबद्दल भाजप चुकीच्या प्रकारे आंदोलन करत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. 



आम्ही संकटकाळात २४ तास विज दिली, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य पार पाडले त्याबद्दल कुणीही बोलायला तयार नाही, त्यांना कोरोना योद्धाही बोलायलाही तयार नाहीत. २४ तास वीज उपलब्ध असल्यानेच हे बिल आले आहे, असा अजब दावाही त्यांनी केला. कोरोनाच्या संकट काळात आम्ही विज देऊ शकलो, त्याबद्दल आमचे आभार कुणी मानत नाही, विजबिलाच्या रक्कमेबद्दल सर्वजण प्रश्न विचारतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. 




"ज्या घरांमध्ये विजपुरवठा बंद आहे, त्या ठिकाणी वाढीव विजबिल आले असल्यास त्यांनी तक्रार केल्यास त्यांना दुरुस्त बिल पाठवून देऊ", असे आश्वासन त्यांनी दिले. ज्यांच्याकडून वाढीव विजबिल आकारले आहे, त्यांना ती रक्कमही परत केली जाणार आहे, मुंबई किंवा उपनगरात ज्या ठिकाणी मीटर कापण्याच्या कारवाया केल्या जात आहेत, त्या चुकीच्या आहेत, असेही ते म्हणाले.



tweet _1  H x W
 
 
 
दरम्यान, नितीन राऊत यांच्या 'वर्क फ्रॉर्म होम'बद्दलच्या वक्तव्यामुळे त्यांना ट्रोल केले जात आहे. घरी बसून काम करणाऱ्यांनी केवळ लॅपटॉप किंवा कम्युटर वापरला तर त्यांचे विजबिल इतके कसे येईल, असा सवाल आता विचारला जात आहे. राऊत यांनी विजबिल माफ करण्याबद्दलही वक्तव्य केले होते. मात्र, त्यासाठी केंद्राकडून मदत हवी असल्याचेही ते म्हणाले.








 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0