गरजूंपर्यंत औषधे स्पीडपोस्टने

13 Apr 2020 21:41:35
Medicine_1  H x

नवी दिल्ली : केंद्रीय दळणवळण, कायदा आणि न्याय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी लॉकडाऊनच्या काळात टपाल विभागाने गरजूंपर्यंत औषधे पोहोचवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची सूचना केली आहे. भारतीय टपाल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना याची माहिती करून द्यावी जेणेकरून कोणालाही औषधे पाठवण्यामध्ये आणि पाठवलेली औषधे मिळवण्यामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाहीत, असे दळणवळणमंत्र्यानी ट्वीटरवरून सांगितले. त्यामुळे गरजूंना आता औषधे स्पीडपोस्टने मिळण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.


Powered By Sangraha 9.0