'महाभोजन'नंतर भाजपचे 'मोदी किट' अभियान

27 Mar 2020 14:17:34
PM-Narendra-modi_1 &
 
 
 
 

घराघरात पोहोचवणार जीवनावश्यक वस्तू


नवी दिल्ली : कोरोना महामारीशी लढा देण्यासाठी भाजपने आता आणखी एक मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमाला 'मोदी किट वाटप अभियान', असे नाव देण्यात आले आहे. यापूर्वी भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी महाभोजन अभियान सुरू करत पाच कोटी जनतेला जेवण देण्याची घोषणा केली होती.
 
 
 
कोरोना विषाणूच्या महामारीमुळे संपूर्ण देशभरातील उद्योगधंदे ठप्प आहेत. यामुळे देशातील सर्वात मोठा पक्ष मानला जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आता मोदी किट वाटप अभियना सुरू केले आहे. याद्वारे गरजूंपर्यंत अत्यावश्यक वस्तू जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे. यात गरजूंसाठी तांदुळ, डाळ, साबण, तेल, बिस्कीट आदी प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत. भाजप मुख्यालयातून या मोहिमेची घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत सर्व वस्तू मोदी किटच्या स्वरुपात जनतेपर्यंत पोहोचवले जाणार आहे.
 
 

यापूर्वी भाजपने महाभोजन अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत भाजपचे एक कोटी कार्यकर्ते पाच कोटी गरजूंनी २१ दिवस जेवण पुरवणार आहेत. भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा वेळोवेळी यासर्व गोष्टींचा आढावा येत्या काही काळात व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेणार आहेत. भाजप नेते कपील मिश्रा यांनीही ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. मोदी किटमध्ये असणाऱ्या सर्व गोष्टींची यादीही त्यांनी त्यासोबत दिली आहे.
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0