२१ दिवस पाच कोटी लोकांना मिळणार मोफत जेवण : भाजपची योजना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2020
Total Views |
JP Nadda_1  H x
 
 
 
नवी दिल्ली : सध्या देशात लॉकडाऊनमुळे हातावरचे पोट असणाऱ्यांना उपाशी झोपावे लागत आहे. देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने या काळात देशातील जनतेसाठी पुढाकार घेत 'महाभोजन' अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत भाजपचे एक कोटी कार्यकर्ते प्रशासनाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करत पाच कोटी लोकांपर्यंत ही योजना पोहोचवणार आहेत.
 
 
 
या अभियानात एक कोटी कार्यकर्ते जोडले जाणार आहेत. सोशल डीस्टंसिंग करत भाजप कार्यकर्त्यांनी काळजीपूर्वक हे अभियान राबवण्याचे आवाहन भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी केले आहे. कोरोनाशी लढत असताना सोशल डीस्टंसिग हेच मोठे अस्त्र असल्याने याचे पालन येत्या काळात आवश्यक आहे. भाजप मुख्यालयात बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. गुरुवार दि. २६ मार्चपासून ही योजना सुरू करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.
 
 
 
यासाठी देशभरातील एक कोटी कार्यकर्त्यांची फौज तयार केली जाणार आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीला पाच व्यक्तींच्या जेवणाची सोय करायची आहे. सलग २१ दिवस हे अभियान चालवले जाणार आहे. याद्वारे गरीबांना मुबलक प्रमाणात भोजन मिळू शकेल, अशी योजना आखली जाणार आहे. देशभरातून या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@