भूमीच्या 'दुर्गामती'वरही का होतेय बंदी घालण्याची मागणी ?

25 Nov 2020 18:45:11

Durgamti_1  H x
 
 
मुंबई : अभिनेत्री भूमी पेडणेकरने 'दुर्गामती' या तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आणि सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनली. दक्षिणात्य चित्रपट 'भागमती'चा हा रिमेक असून यामध्ये भूमी पेडणेकरची प्रमुख भूमिका आहे. मूळ चित्रपटाचे दिग्दर्शक अशोक यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच, भूषण कुमार यांच्या टी -सीरीज आणि अक्षय कुमारच्या केप ऑफ गुड फिल्म बॅनरअंतर्गत प्रस्तुत करण्यात येत आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सोशल मिडियावर करण्यात येत आहे.
 
 
पहिले अक्षयचा 'रामसेतू', आता 'दुर्गामती'
 
 
अभिनेता अक्षय कुमारने 'लक्ष्मी' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ड्रग्स आणि बॉलीवूड यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 'एकजण ड्रग्स घेतो म्हणजे संपूर्ण बॉलीवूड ड्रग्स घेते असे होत नाही. त्यामुळे कृपया प्रतिमा मलीन करू नका' असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर त्याच्यावर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षयने असे केले असल्याचा आरोप ठेवण्यात आला.
 
 
 
 
 
त्यानंतर 'रामसेतू' या त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केल्यावरही बंदीची मागणी करण्यात आली होती. आता 'दुर्गामती' चित्रपटावरही बंदी घाला असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे.
 
 
 
 
 
 
सुशांत आणि दिशाला न्याय द्या ; सोशल मिडियावर मागणी
 
 
अभिनेत्री भूमी पेडणेकरने अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये रिया चक्रवर्तीची पाठराखण केली होती. तिच्या या भूमिकेमुळे या चित्रपटावर बंदी घालून सुशांतसिंग आणि दिशा सालियन यांना न्याय द्या, अशी मागणी सोशल मिडीयावर काही जणांनी केली आहे.
 
 
 
 
  
त्यामुळे हे मुद्दे किती योग्य आहेत? आणि या चित्रपटांवर बंदी घालणे कितीपत योग्य आहेत? सोशल मिडियाच्या या हॅशटॅग मोहिमेवरून चित्रपट आणि मालिकांवर काही परिणाम पडेल का? बॉलीवूडमधील 'मास डीसलाईक' हा प्रकार कधी थांबणार? हादेखील मोठा प्रश्न समोर उभा आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0