करमुसे प्रकरण : पोलीसांवर कारवाई, मुख्य सुत्रधार गजाआड होणार का ?

05 Oct 2020 18:38:49

karmuse_1  H x



ठाणे :
ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे यांच्या मारहाणप्रकरणात तिघा पोलिस शिपायांवर कारवाई झाली असली, तरी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गजाआड होणार का, असा सवाल भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केला आहे.



गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट टाकल्याचा आरोप करीत इंजिनिअर अनंत करमुसे यांना घरातून नेऊन आव्हाड यांच्या बंगल्यात मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीच्यावेळी मंत्री आव्हाड उपस्थित असल्याचे करमुसे यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते. ५ एप्रिल रोजी मध्यरात्री करमुसे यांना घरातून आव्हाडांच्या सुरक्षा व्यवस्थेतील तिघा पोलिस शिपायांनी नेले होते. या प्रकरणी सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नोंद झाली होती. सुमारे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या या प्रकरणात आज वर्तकनगर पोलिसांनी कारवाई करून तिघा पोलिस शिपायांना अटक केली.


या प्रकरणात सहा महिन्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्याबद्दल ठाणे पोलिसांचे मन:पूर्वक अभिनंदन. अटक केलेल्या तिघाही पोलिस शिपायांचे करमुसे यांच्याबरोबर वैयक्तिक वाद नाहीत. त्यांनी करमुसे यांना कोणाच्या आदेशावरुन घरातून आणले. या संदर्भात कसून चौकशी होण्याची गरज आहे. त्यातून या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराचा छडा लावण्याची आवश्यकता आहे. त्यातील मुख्य सुत्रधारावर कारवाई केव्हा होणार, असा सवाल आमदार निरंजन डावखरे यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण ?
कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर देशाच्या पंतप्रधानानी ५ एप्रिलच्या रात्री दिवे लावण्याचे आवाहन देशवासियांना केले होते.पंतप्रधानांच्या या आवाहनाला विरोध करीत ना. जिंतेंद्र आव्हाड यांनी विरोधी प्रतिक्रिया सोशल मिडीयात व्यक्त केली होती.त्यावर ठाण्यातील उन्नती वुडस येथे राहणारे अनंत करमुसे या इंजिनियरने आव्हाड यांच्या विरोधात फेसबुकवर एक पोस्ट टाकली.त्याचाच राग मनांत धरुन ५ एप्रिलच्या रात्री ११ :५०च्या सुमारास दोन गणवेषातील पोलिस व दोघे साध्या वेषातील पोलीस या तरुणाच्या घरी आले आणि तुम्हाला पोलिस स्टेशनला बोलवलं आहे.असं सांगून बळजबरीने स्कॉर्पिओ व इनोव्हा गाडीतुन सायबर गुन्हे शाखा व पोलीस ठाण्याऐवजी थेट ना. जितेंद्र आव्हाड यांच्या विवियाना माॅलमागील नाथ बंगल्यावर नेऊन पोलिसांच्या फायबर काठीच्या चिंधडया उडेपर्यत मारहाण केली होती.

Powered By Sangraha 9.0