चीनमधून परतणाऱ्या भारतीयांच्या तपासणीसाठी भारतीय सैन्याची विशेष तपासणी केंद्रें

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2020
Total Views |

ADGPI_1  H x W:


नवी दिल्ली : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चीनमधील वुहान प्रांतातून भारतात परतणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी भारतीय सैन्यातर्फे विशेष सुविधा करण्यात आली आहे. सैन्यातर्फे हरियाणातील मानेसर येथे विशेष वैद्यकीय कक्ष स्थापन करण्यात आला असून तेथे सुमारे ३०० जणांना ठेवण्याची सुविधा आहे. या कक्षात विद्यार्थ्यांची तज्ज्ञ डॉक्टर्सतर्फे तपासणी करण्यात येणार असून त्यांना किमान दोन आठवडे देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.





चीनच्या वुहान प्रांतातून सुरूवात झालेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव चीनसह जगातील सुमारे १७ देशांमध्ये झाला आहे. विषाणूमुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले असून चीनमधील वुहान प्रांतात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी शुक्रवारी विशेष विमान रवाना झाले आहे. चीनमधील या प्रांतात ३०० भारतीय विद्यार्थी अडकले असून त्यांना परत आणले जाणार आहे.




विद्यार्थ्यांना भारतात आणल्यानंतर त्यांची तपासणी करण्यासाठी भारतीय सेनेने हरियाणातील मानेसर येथे विशेष वैद्यकीय कक्ष उभारला आहे. भारतीय सैन्याकडून प्राप्त माहितीनुसार सदर विद्यार्थ्यांचे सर्वप्रथम विमानतळावर त्यांचे स्क्रिनींग केले जाणार आहे, त्यानंतर त्यांना मानेसर येथील विशेष कक्षात दाखल करण्यात येईल. तपासणीदरम्यान एखादा विद्यार्थ्यास विषाणूची लागण झाल्याचा संशय आल्यास त्यास दिल्ली छावणीमधील रूग्णालयात दाखल करण्यात येईल. सदर भारतीय विद्यार्थ्यांची तपासणी आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हीस (एएफएमएस) आणि विमानतळ स्वास्थ्य प्राधिकरण (एपीएचओ) यांच्यातर्फे संयुक्तरित्या केली जाणार आहे.


@@AUTHORINFO_V1@@