चीनमधील भारतीय मायदेशी परतणार !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2020
Total Views |

air india special flight



नवी दिल्ली
: चीनमध्ये अडकलेल्या भारतीय  नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विशेष विमान आज रवाना झाले. ४२३ आसनक्षमता असणारे 'जम्बो बी ७४७' हे विमान दिल्लीहून निघून चीनच्या वुहान शहरात उतरेल, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली.


मुंबईहून आज सकाळीच हे विमान दिल्लीला पोहोचले आहे. आज दुपारी निघालेले हे विमान उद्या पहाटे दोनच्या दरम्यान भारतात परत येईल. यावेळी कमीत कमी ४०० नागरिकांना परत आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या विमानात एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसह पाच डॉक्टरांचे एक विशेष पथकदेखील असणार आहे.


कालच चीनच्या हुबेई प्रांतातील भारतीय नागरिकांनी व काही विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावासाकडे मदतीची याचना केली होती. त्यानुसार चीनने भारताकडे परवानगी मागितली होती. यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चीनमधील भारतीय दूतावास सरकारशी संपर्कात आहेत, हि माहिती परराष्ट्र मंत्रालायचे रविश कुमार यांनी दिली होती. हि सर्व कारवाई पार पद्लाने आता हे विमान चीनकडे रवाना झाले आहे.


या विषाणूमुळे चीनमध्ये तब्बल २१३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तब्बल दहा हजारांच्या आसपास लोकांना या विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहता, जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. जगभरातील देश आपापल्या नागरिकांना चीनमधून परत मायदेशी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानने मात्र आपल्या देशातील नागरिकांना मायदेशी परत आणण्यास नकार दिला आहे.
@@AUTHORINFO_V1@@