सकारात्मक सरकारी निर्णयामुळे शेअर बाजाराची उसळी

26 Aug 2019 12:53:38


 


मुंबई : अर्थव्यवस्थेतील मरगळ झटकण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या घोषणा आणि गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे गेल्या काही दिवसांपासून गटांगळ्या खाणारा शेअर बाजाराने सोमवारी सकाळच्या सत्रात जोरदार उसळी घेतली. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास तो ४७०.४३ अंशांनी वधारून ३७ हजार १७५ अंशांवर कामगिरी करत होता. त्यामुळे आठवड्याची सुरुवात तेजीने झाली.

 

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४७०.४३ अंशांनी वधारला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १४१ अंशांनी वधारून १० हजार ९६८ अंशांवर कामगिरी करत होता. दरम्यान यापूर्वी शुक्रवार, दि. २३ ऑगस्ट रोजी भारतीय रुपया २०१९ मध्ये पहिल्यांदाच घसरत प्रतिडॉलर ७२ रुपयांवर कामगिरी करत होता. सोमवारी सुरुवातीच्या सत्रात ४२ अंशांनी घसरून ७२.०८ रुपयांवर कामगिरी करत होता. अमेरिका आणि चीन या देशांमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धाचा फटका रुपयालाही बसत आहे. केंद्र सरकारने अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केलेल्या महत्वपूर्ण घोषणांनंतर शेअर बाजारात पुन्हा तेजी दिसून आली.



संबंधित लेख - शेअर मार्केट एक उत्तम व्यवसाय

 

Powered By Sangraha 9.0