शेअर मार्केट एक उत्तम व्यवसाय

    दिनांक  26-Aug-2019 12:08:57


शेअर बाजार शेअर बाजार म्हणजे नक्की काय ? याला एका शब्दात सांगायचं झाले तर एक व्यवसाय होय अगदी बरोबर शेअर बाजार हा एक व्यवसायच आहे, पण आपण शेअर बाजार शब्द ऐकला की म्हणतो शेअर बाजार म्हणजे जुगार व नुकसान खरच शेअर बाजार जुगार असतो तर या क्षेत्रात लोकांनी येऊन पैसे कमावले नसते किंवा गुंतवणूक देखील केली नसती. आपण शेअर मार्केटकडे कोणत्या दृष्टिकोनातुन बघतो हे यावर सर्व काही अवलंबून असते.

 

शेअर बाजाराच्या आकर्षणाने अनेक लोक शेअर बाजारात येतात व निघून जातात कारण त्यांना शेअर बाजाराकडे व्यवसाय म्हणून बघायचे नसते ते फक्त शेअर बाजारात आपले नशीब आजमवण्यासाठी येत असतात त्यांना या बद्दल काहीही माहिती नसते त्यांना असे वाटते की, 'शेअर बाजारात पैसे गुंतवले की श्रीमंत होता येते तेही झटपट काहीही मेहनत न करता श्रीमंत होण्याचा सोपा मार्ग म्हणजे शेअर बाजार.'

 

शेअर बाजारात काम करत असताना आपण या क्षेत्रात का काम करत आहेत, याची पूर्ण कल्पना आपल्याला असणे गरजेचे असते. या क्षेत्रात आपण किती गुंतवणूक करावी किंवा किती तोटा सहन करू शकतो या सर्व गोष्टींचा अभ्यास हा शेअर बाजारात उतरण्याआधीच केलेले कधीही चांगले. कित्येक लोक शेअर बाजारात कोणत्याही गोष्टीचा अभ्यास न करता गुंतवणूक करतात आणि नंतर नुकसान झाले की शेअर बाजार जुगार आहे, असे म्हणायला सुरुवात करतात.

 

जसा व्यवसायत नफा व तोटा होतो तसाच शेअर बाजारात सुद्धा नफा व तोटा चालूच असते. नेहमीच फायदा होईल, असे नाही कधी कधी आपल्याला नुकसानही सहन करावे लागते, पण नुकसान हे नफ्यापेक्षा जास्त नसावे अस जर होत असेल तर आपण काहीतरी चूक करत आहोत ती चूक वेळीच सुधारली गेली पाहिजे नाहीतर आपले शेअर बाजारातले अस्तित्व लवकरच संपू शकते.

 

शेअर बाजारात प्रत्येक माणसाने गुंतवणूक करावी पण झटपट श्रीमंत होण्याची स्वप्न बघू नये इथे योग्य पद्धतीने गुंतवणूक किंवा ट्रेडिंग केली तर फायदा हा होतोच. तर शेअर मार्केट मध्ये सर्वांनी गुंतवणूक करा व त्या गुंतवणूकिचा नेहमी आढावा घ्या कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करून विसरून न जाता नेहमी आपल्या गुंतवणूक विषय माहिती ठेवावी जेणे करून आपण केलेली गुंतवणूक ही बरोबर आहे की चूक हे समजण्यासाठी मदत होते. शेअर बाजारात पैसा बनतो फक्त आपल्या योग्य अभ्यास करून बनवता आला पाहिजे. तर योग्य पध्दतीने अभ्यास करा व शेअर बाजारात नफा मिळवा.

 

- नितीलेश पावसकर

(सेबी रजिस्टर रिसर्च अनलिस्ट)

तनिषा अकॅडमी

8605168525