'इंटरनेट आॅफ बर्ड्स अॅप'व्दारे आता पक्ष्यांची ओळख पटवा चुटकीसरशी !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2019   
Total Views |


 
 
 

लोणावळा (अक्षय मांडवकर)- एखादा पक्षी दिसल्यावर त्याची ओळख पटवण्यास तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात का ? आता तुमचे कष्ट एका अॅपमुळे वाचणार आहेत. 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) अॅक्सच्युअर लॅबच्या मदतीने 'इंटरनेट आॅफ बर्ड्स' हा अॅप विकसित केला आहे. या अॅपमध्ये पक्ष्याचा फोटो टाकल्यानंतर चुटकीसरशी त्याचे नाव समोर येते. 'गुगल प्ले स्टोअर'वर हे अॅप विनामूल्य उपलब्ध असल्याने ते सहजरित्या डाऊनलोड करणे शक्य आहे.


 

 

'बीएनएचएस'कडून लोणावळ्यात पाच दिवसीय 'पाणथळ जागा आणि स्थलांतर' पक्षी याविषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी पार पडलेल्या या परिषदेच्या पहिल्या दिवशी 'इंटरनेट आॅफ बर्ड्स' या अॅपचे लोकार्पण करण्यात आले. हे अॅप सर्वसामान्यासह पक्षी निरीक्षकांना उपयुक्त ठरणार आहे. कारण, एखाद्या पक्ष्याची ओळख पटवण्याचे काम हे अॅप काही सेकंदामध्ये पूर्ण करते. या अॅपमध्ये पक्ष्याचे काढलेले छायाचित्र अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. फोटो अपलोड केल्यानंतर काही क्षणात हे अॅप त्या पक्ष्याचे नाव सांगते. महत्वाचे म्हणजे हे अॅप इंटरनेट सुविधेशिवाय देखील काम करत असल्याची माहिती अॅपची निर्मिती केलेल्या 'अॅक्सच्युअर लॅब'चे व्यवस्थापकीय संचालक संजय पोद्दार यांनी दिली. यासाठी 'आर्टिफिशल इन्टेलिजन्स'चा वापर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 
 
 

 

 
 ( अॅपचे निर्माते संजय पोद्दार )
 

११० एमबी आकाराचे हे अॅप गुगल प्ले स्टोअर विनामूल्य उपलब्ध आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षणामध्ये रस असणाऱ्या मात्र, त्याविषयी अधिक माहिती नसलेल्या लोकांकरिता हे अॅप उपयुक्त ठरणार असल्याचे 'बीएनएचएस'चे संचालक डाॅ. दिपक आपटे यांनी सांगितले. सध्या या अॅपमध्ये पक्ष्यांच्या सहाशे प्रजातींची माहिती नोंदविण्यात आली आहे. भविष्यात त्यामध्ये पक्ष्यांच्या १३ हजार प्रजातींची नोंद करण्यात येणार आहे. भविष्यात या अॅपमध्ये पक्ष्यांच्या आवाजावरुन त्यांची ओळख पटवण्याची सुविधा भविष्यात या अॅपमध्ये उपलब्ध करुन देण्याच्या आम्ही विचारात असल्याची माहिती आपटे यांनी दिली.  
@@AUTHORINFO_V1@@