दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी वर्ष

आदरणीय दत्तोपंत ठेंगडी : एक पर्यायी विचार!

जोसेफ स्टीग्लीट्स म्हणतात की, "प्रत्येक देशाने आपली परंपरा, इतिहास, संस्कृती, वैशिष्ट्ये व आवश्यकता यांचा विचार करून बाजाराधिष्ठित अर्थरचनेचा (Market Economy) विचार केला पाहिजे." पर्यायी आर्थिक नीतीचा विचार दृढ करण्यासाठी अथक परिश्रम करून उपहास, उपवास यांचा सामना करून तिसऱ्या पर्यायास (Third way) चालना देण्याचे व्रत घेतलेले व्रतस्थ महामानव आदरणीय दत्तोपंत ठेंगडी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष!..

विचारवंत-संघटक

दत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रत्येक कृतीमागे एक निश्चित असा विचार होता, त्या विचारांना तत्त्वांचा आधार होता. त्यातूनच कार्यकर्त्याच्या मनावर संस्कार होई व कार्यकर्ता प्रशिक्षित होत असे. अशा प्रकारे दत्तोपंतांनी अनेक कार्यकर्त्यांना नव्हे तर सामान्यांनाही आपल्या कळत-नकळत केलेल्या कृतीने संस्कारित केले. या अर्थाने ते केवळ कृतिशील कार्यकर्ते नव्हते तर त्यांच्यात एक विचारवंतही दडलेला होता. अशा विचारवंत दत्तोपंतांनी अनेक तात्त्विक ग्रंथांची रचना करून अमोल विचारधन निर्माण करून ठेवले आहे. म्हणून त्यांना 'विचारवंत ..

दत्तोपंत ठेंगडी यांचे आर्थिक चिंतन

श्रीगुरुजी व दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांचा प्रतिध्वनी, विस्तार व विशदीकरण हे दत्तोपंत ठेगडी यांच्या विचारात दिसते पण नव्या परिस्थितीला उदा. जागतिकीकरण, शिथिलीकरण इ. ना आवश्यक असे नवमार्गदर्शनही त्यांनी केले. स्वतः अनेक संघटना चालवित असल्याने विचार मांडताना त्यातील व त्या क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवांच्या आधारे दत्तोपंतांनी केलेले विचार प्रकटन हे व्यावहारिक असे. त्यामुळे तत्त्व व व्यवहार यांचा सुमेळ घालणारा उच्च कोटीचा विचारक व समाजशिल्पी हे त्यांचे विशेष स्थान होते. ते कसे, हे जाणून घेऊया.....

दत्तोपंत ठेंगडींचे विचार आजच्या संदर्भात

दत्तोपंत ठेंगडी यांच्या विचारांचे सार पाहिले तर असे दिसते की, त्यांच्या मते देशाच्या कोणत्याही क्षेत्राचा आत्मा ‘सर्वे भवन्तु सुखिन:’ असायला हवा आणि कोणत्याही प्रगतीचा केंद्रबिंदू एकात्म मानवदर्शनानुसार अंत्योंदय असायला हवा आणि प्रगतीमध्ये समरसता असायला हवी. समाजाच्या समरस जीवंतपणासाठी, एकात्मतेसाठी दत्तोपंत ठेंगडींचे विचार आजही प्रेरणादायी दीपस्तंभ आहेत. वर्तमानस्थितीमध्ये त्यांचे विचार जीवनाला नैतिक, धार्मिक, सामाजिक आणि आर्थिकही समृद्धी देतात...

श्रमयोगी स्वयंसेवक दत्तोपंत ठेंगडी

संघात आपल्या ध्येयाबद्दलची बांधिलकी, समर्पितता, विश्वसनीयता यांना जास्त महत्त्व दिले जाते. अभ्यास, अनुसंधान, वैचारिक अधिष्ठान व त्याप्रमाणे संघटनेची रचना व बांधणी करून कामगार क्षेत्रात राष्ट्रानुकूल परिवर्तन घडवून आणणारे द्रष्टे श्रमयोगी म्हणून दत्तोपंत ठेंगडी सर्वार्थाने द्रष्टे श्रमयोगी आणि सदा श्रद्धेय आहेत...

प्रेरक चरित्र दत्तोपंतांचे

समाजजीवनाच्या सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये दत्तोपंतांनी स्थापन केलेल्या संस्था आज प्रतिष्ठाप्राप्त आणि एकूण धोरणांना इष्ट वळण देण्याची क्षमता असलेल्या संघटना या नात्याने सुप्रतिष्ठित झाल्या आहेत. ‘दाही दिशांना जाऊ फिरू, मेघासम आकाश भरू, अथक निरंतर परिश्रमाने, या भूमीचा स्वर्ग करू’ अशी अत्यंत उदात्त विश्वासक प्रेरणा हे दत्तोपंत ठेंगडी यांच्या सार्थक जीवनाचे शाश्वत सार आहे...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर दत्तोपंत ठेंगडींच्या दृष्टिकोनातून

"१९व्या शतकातील प्रारंभापासून सुरू झालेल्या प्रबोधन-परिवर्तन पर्वाचा एका अर्थाने कळीचा अध्याय किंवा सामाजिक क्रांतीच्या वाटचालीतील निर्णायक टप्पा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबडेकरांचे कार्य आहे," हे सूत्र केंद्रस्थानी ठेऊन दंतोपंतांनी या ग्रंथात मांडणी केलेली दिसते. ठेंगडींनी त्यांच्या दृष्टिकोनातून डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा व तत्त्वज्ञानाचा जो पट या ग्रंथात मांडला आहे, त्याचा संक्षिप्त आढावा आपण या लेखात घेणार आहोत...

श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी : समर्पित जीवन

भारतीय कामगार चळवळीला साम्यवाद्यांच्या विळख्यातून मुक्त करून भारतीय संस्कृतीशी जोडण्याचे अतुलनीय कार्य श्रद्धेय ठेंगडीजी यांनी अतिशय परिश्रमाने केले आहे. अशा या महनीय व्यक्तीच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात दि. १० नोव्हेंबरपासून सुरू झाली. त्यानिमित्ताने त्यांचे जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा लेख.....

कामगार चळवळीला भारतीयत्व व राष्ट्रवादाशी जोडणारे

‘जगातील कामगारांनो एक व्हा’ म्हणणार्‍या साम्यवाद्यांचीही अनेक शकले झाली. कामगारहितामध्ये तेसुद्धा एकत्र काम करू शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर १९५५ साली शून्यातून स्थापन झालेला १९८४ साली देशात दुसर्‍या क्रमांकावर आणि १९९४ पासून प्रथम क्रमांकावर असलेला ‘भारतीय मजदूर संघ’ आजही वर्धिष्णू आहे. ६५ वर्षांच्या काळात विभाजनाचा प्रश्न कधीही उद्भवलाच नाही. त्याचे कारण दत्तोपंत ठेंगडीजींनी घातलेला भक्कम पाया व मार्गदर्शन...

श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडीजींच्या सहवासात...

थोर माणसांचा सहवास लाभणे, भाग्यात असावे लागते. आपण सर्व पुनर्जन्म मानणारे आहोत. मागील जन्मात माझ्या हातून काही पुण्य घडले असावे, त्यामुळे श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडीजींसारख्या थोर पुरुषाचा सहवास मला लाभला. दत्तोपंतांचे एका वाक्यात वर्णन करायचे तर ऊस जसा अंतर्बाह्य गोड असतो, तसे दत्तोपंत ठेंगडी म्हणजे अंतर्बाह्य गोडवा...

समग्र समाजचिंतक

युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपुरुष बाबासाहेब आंबेडकर आणि समरसतेचे महामेरू, प्रवर्तक, प्रेरणास्रोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समरसतेच्या वाटचालीतील मुख्य प्रेरणापुरुष असल्याची मीमांसा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे या संपूर्ण सामाजिक सुधारणेच्या चळवळीतील वेगळेपण इतक्या प्रभावीपणे अन्य कुणी कदाचित मांडले असेल आणि म्हणूनच दत्तोपंत ठेंगडींची समरसतेच्या संदर्भातील भूमिका विवादरहित आणि स्वीकार्यता सर्व स्तरांतून होते...

संघ तत्त्वज्ञानाचा वैचारिक भाष्यकार

दत्तोपंत ठेंगडी यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष सुरु होत आहे. दत्तोपंतांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता म्हणून काम करताना वैचारिक आणि सैद्धांतिक मुद्दे मांडले. परंतु, त्यांची वैचारिक पायाभरणी कशी झाली? श्रीगुरुजी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या तत्त्वांना त्यांनी परिभाषित कसे केले? मानवी हित आणि मानवी मूल्यं कायम ठेवण्यासाठी दत्तोपंतांनी मोठे कार्य केले ते आणि वरील सर्वच प्रश्नांची उत्तरे आपल्याला या लेखातून मिळतात...