शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार रक्कम

Total Views |
 
Farmer loan waiver
 
मुंबई : (Farmer loan waiver) राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती' योजनेच्या अंमलबजावणीला वेग आला आहे. सुमारे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून आता कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. (Farmer loan waiver)
 
महायुती सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजुरी दिल्यानंतर योजनेचा अध्यादेशही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. (Farmer loan waiver)
 
जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून रक्कम जमा...
 
योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून थेट कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती माध्यमांवरून मिळत आहे. यासाठी सरकारने तयार केलेले अधिकृत संकेतस्थळ पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आले असून बँकांकडून पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.(Farmer loan waiver)
 
या योजनेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना कोणताही अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. संबंधित बँका आपल्या कर्जदारांची माहिती थेट सरकारी पोर्टलवर अपलोड करणार आहेत.(Farmer loan waiver)
 
यानंतर आधार प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना स्वतःची माहिती तपासता येईल. माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतरच अंतिम प्रमाणीकरण पूर्ण करता येणार आहे. (Farmer loan waiver)
 
१६ लाखांहून अधिक शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त...
 
या योजनेत २ लाख रुपयांपर्यंतचे (मुद्दल व व्याजासह) पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील १६ लाख ४८ हजार शेतकऱ्यांच्या सुमारे १७.५५ लाख कर्ज खात्यांचे संपूर्ण कर्ज माफ होणार आहे. यासाठी राज्य सरकारवर अंदाजे १४ हजार ७५४ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Farmer loan waiver)
 
नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही लाभ
 
फक्त कर्जमाफीच नव्हे, तर नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारकडून प्रोत्साहन दिले जाणार आहे. राज्यातील २३.६३ लाख प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहे. (Farmer loan waiver)
 
ज्या शेतकऱ्यांवर २ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे अशा सुमारे २ लाख ९० हजार शेतकऱ्यांनाही सरकारने दिलासा दिला आहे. या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपेक्षा जास्त असलेली थकबाकी भरण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. (Farmer loan waiver)
 
राज्यातील लाखो शेतकरी या योजनेकडे आशेने पाहत होते. आता जुलैपासून प्रत्यक्ष लाभ खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. कर्जमाफीसोबतच नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याच्या निर्णयाचेही स्वागत होत आहे. (Farmer loan waiver)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com