मुंबई: (LPG Price Hike) वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना रविवारी ७ जून रोजी आणखी एक मोठा झटका मिळाला आहे. घरगुती वापराच्या १४.२ किलो एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ करण्यात आली असून, नव्या दरवाढीमुळे लाखो कुटुंबांचे मासिक किचन बजेट कोलमडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (LPG Price Hike)
नवीन दर रविवारी सकाळपासून लागू झाले असून, देशभरात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत समान वाढ करण्यात आली आहे. दरवाढीनंतर मुंबईत १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ९१२.५० रुपयांवरून ९४१.५० रुपयांवर पोहोचली आहे. तर राजधानी दिल्लीत हा दर ९१३ रुपयांवरून ९४२ रुपयांवर गेला आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ असून, यापूर्वी ७ मार्च रोजी घरगुती सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती. (LPG Price Hike)
पेट्रोल, डिझेल, भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच आर्थिक तणावात आहेत. त्यात आता एलपीजी सिलेंडरच्या दरवाढीमुळे घरगुती खर्चाचा ताळमेळ राखणे अधिक कठीण होणार आहे. विशेषतः मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांवर या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. (LPG Price Hike)
एलपीजी उत्पादन करणाऱ्या सरकारी तेल कंपन्या अजूनही प्रत्येक घरगुती सिलेंडरमागे सुमारे ७०३ रुपयांचा तोटा सहन करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भविष्यातही सिलेंडरच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याआधी १ जून रोजी व्यावसायिक वापराच्या १९ किलो एलपीजी सिलेंडरच्या दरात ४२ रुपयांची वाढ करण्यात आली होती. (LPG Price Hike)
धक्कादायक बाब म्हणजे, वर्षाच्या सुरुवातीला १९ किलोच्या सिलेंडरची किंमत सुमारे १५८० रुपये होती. ती आता ३११३.५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच अवघ्या पाच महिन्यांत व्यावसायिक सिलेंडरच्या दरात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. (LPG Price Hike)
व्यावसायिक एलपीजीच्या वाढलेल्या किमतीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थ व्यवसायाच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. परिणामी अनेक ठिकाणी खाद्यपदार्थांचे दर वाढवण्यात आले असून ग्राहकांनाही त्याचा फटका बसत आहे. (LPG Price Hike)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.