लाडक्या बहिणींना ₹३००० एकत्र मिळणार? मे-जून हप्त्याबाबत मोठी अपडेट; महिलांचे लक्ष सरकारच्या निर्णयाकडे

Total Views |
 
Ladki Bahin Yojana
 
मुंबई: (Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये सध्या एकच चर्चा रंगली आहे. मे आणि जून महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार का? जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी मे महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नसल्याने राज्यातील लाखो महिलांच्या नजरा सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागल्या आहेत. (Ladki Bahin Yojana)
 
दरम्यान, राज्यात विधान परिषद निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने हप्ता वितरणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹१५०० आर्थिक मदत दिली जाते. साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत हप्ता जमा केला जातो. मात्र यंदा मे महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. (Ladki Bahin Yojana)
 
यामुळे मे आणि जून या दोन्ही महिन्यांचे मिळून ₹३००० एकत्र खात्यात जमा होणार का, याबाबत महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र वितरित करण्याबाबत विचार सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र यासंदर्भात सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (Ladki Bahin Yojana)
 
आचारसंहितेमुळे हप्ता रखडला?
 
राज्यात १८ जून रोजी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर नवीन आर्थिक निर्णय किंवा लाभ वितरणाबाबत निर्बंध असू शकतात. त्यामुळे मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हप्ता वितरणाची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीनंतरच लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता अधिक असल्याचे माध्यमांवरून म्हटले जात आहे. (Ladki Bahin Yojana)
 
प्रशासकीय स्तरावर सुरू असलेल्या चर्चेनुसार, जून महिन्याच्या अखेरीस मे आणि जून या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात. तथापि, अंतिम निर्णय राज्य सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे. (Ladki Bahin Yojana)
 
योजनेअंतर्गत ई-केवायसी आणि पडताळणी प्रक्रियेनंतर मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची छाननी करण्यात आली. निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. सुमारे ८० लाख महिलांचा लाभ बंद करण्यात आला असून सध्या अंदाजे १ कोटी ६६ लाख पात्र महिलांना दरमहा ₹१५०० आर्थिक सहाय्य दिले जात आहे. (Ladki Bahin Yojana)
 
मे आणि जून महिन्याच्या हप्त्याबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तोपर्यंत लाभार्थी महिलांनी अफवांवर विश्वास न ठेवता सरकारच्या अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. (Ladki Bahin Yojana)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com