नवी दिल्ली: (Cockroach Janata Party Delhi Protest) सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान काही तरुणांचा उल्लेख झुरळ असा केला. त्यानंतर, सोशल मीडियातून उदयास आलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'ने आता नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळलेली असताना सीजेपीने थेट रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे शनिवारी ६ जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून पक्षाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. (Cockroach Janata Party Delhi Protest)
या आंदोलनाचे नेतृत्व कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आणि अध्यक्ष अभिजीत दीपके करत आहेत. महाराष्ट्रात जन्मलेले आणि सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेले दीपके खास या आंदोलनासाठी भारतात दाखल झाले आहेत. (Cockroach Janata Party Delhi Protest)
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान काही तरुणांचा उल्लेख 'झुरळ' असा केल्याचा दावा समोर आल्यानंतर सोशल मीडियावर 'कॉकरोच जनता पार्टी' ही चळवळ सुरू झाली. काही दिवसांतच या चळवळीच्या इन्स्टाग्राम खात्याला कोट्यवधी फॉलोअर्स मिळाले. ऑनलाइन चर्चेतून सुरू झालेली ही चळवळ आता प्रत्यक्ष आंदोलनाच्या स्वरूपात समोर आली आहे. त्यामुळे ही खरोखरच कोणती चळवळ आहे की, कोणाचा राजकीय अजेंडा असे प्रश्नही आता निर्माण होत आहेत. (Cockroach Janata Party Delhi Protest)
अभिजीत दीपके भारतात दाखल होताच त्यांचे दिल्ली विमानतळावर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये दीपके यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक दिसत आहे. विमानतळावरून थेट आंदोलनस्थळी रवाना झालेल्या दीपके यांनी आंदोलनासाठी आवश्यक परवानग्या घेतल्यानंतर जंतर-मंतर येथे मोर्चा वळवला. (Cockroach Janata Party Delhi Protest)
आंदोलनस्थळी अनेक तरुण-तरुणींची उपस्थिती पाहायला मिळाली. आंदोलनात सहभागी झालेल्या युवकांच्या हातात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे फोटो असलेले पोस्टर्स झळकत होते. या पोस्टर्सवर 'बेटा, तुमसे ना हो पाएगा...' असे घोषवाक्य लिहिण्यात आले होते. (Cockroach Janata Party Delhi Protest)
दिल्ली पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीला जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यास परवानगी दिली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आंदोलनाची अनुमती देण्यात आली असून आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे. (Cockroach Janata Party Delhi Protest)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.