"शशी थरूर यांना वाचवण्यात सोनिया गांधींचा हात..."; आयपीएल कोची वादावर ललित मोदींचा मोठा दावा

Total Views |


 
Shashi Tharoor
 
मुंबई: (Shashi Tharoor) आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी लंडनहून एएनआयला दिलेल्या मुलाखतीत २०१० मध्ये घडलेला कोची टस्कर्स घोटाळा आणि त्या प्रकरणावर झालेल्या राजकीय हस्तक्षेपाविषयी मौन सोडले आहे. मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या प्रकरणात शशी थरूर यांचे संरक्षण केले आणि सुनंदा पुष्कर यांना स्वस्त किंवा मोफत इक्विटी देण्याच्या व्यवहाराला बचाव मिळाला. (Shashi Tharoor)
 
मोदींच्या म्हणण्यानुसार कोची कन्सोर्टियमच्या आर्थिक रचनेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले तेव्हा संपूर्ण यूपीए सरकार त्यांच्या विरोधात उभी राहिली. त्यांनी दावा केला की सनंदा पुष्कर यांना कोणतीही आर्थिक गुंतवणूक न करता २५% मोफत इक्विटी आणि १५% महसूल वाटप देण्यात आले होते. (Shashi Tharoor)
 
या मुलाखतीत मोदींनी सांगतले की, जेव्हा त्यांनी या व्यवहारावर सही करण्यास नकार दिला, तेव्हा केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी त्यांना फोन करून सुनंदा पुष्करबद्दल वाद करु नये असे म्हणाले; तसे केल्यास कठोर कारवाईचा इशारा देखील दिला गेला. मोदी यांनी दावे केले की, "सोनिया गांधींनी शशी थरूर यांचे संरक्षण केले" आणि त्यानंतर त्यांच्यावर अनेक वरिष्ठ नेत्यांकडून दबाव आले; अहमद पटेल, प्रणब मुखर्जी व राजीव शुक्ला यांच्या फोनचा त्याने उल्लेख केला. (Shashi Tharoor)
 
मोदी म्हणाले की बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या दबावाखाली त्यांना शेवटी करारावर स्वाक्षरी करावी लागली आणि त्यांनी कागदपत्रावर स्वतः लिहिले की ते दबावाखाली स्वाक्षरी करत आहेत. (Shashi Tharoor)
 
कोची घोटाळा नेमका काय?
 
२०१० मध्ये आयपीएलच्या विस्तारात कोची टस्कर्स फ्रँचायझीच्या खरेदीकरिता ३.५ अब्ज डॉलर्स (३५० दशलक्ष डॉलर्स) असे बोलीचे आणि गुंतवणुकीचे तपशील समोर आले. मोदींचा आरोप होता की सुनंदा पुष्कर यांना पैशाशिवाय मोठा हिस्सा देण्यात आला, जे थरूर यांच्या जवळीक आणि प्रभावामुळे शक्य झाले. त्यानंतर या प्रकरणामुळे थरूर यांनी २०१० मध्ये केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला, ललित मोदी यांना आयपीएल अध्यक्षपदावरून हटवण्यात आले आणि त्वरित चौकशी सुरू झाली आणि ते लंडनला निघून गेले. २०११ मध्ये कोची फ्रँचायझी केवळ एका हंगामानंतर बंद करण्यात आली. त्यानंतर जानेवारी २०१४ मध्ये दिल्लीतील हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह अत्यंत गूढ परिस्थितीत आढळला. (Shashi Tharoor)
 








मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com