नवी दिल्ली: (K Annamalai) तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि अण्णा द्रमुक युती चांगली कामगिरी करु शकली नाही. तामिळनाडूत सत्तांतर घडले मात्र देशभरात करिष्मा असलेली भाजप तामिळनाडूत पाय रोवण्यात अपयशी ठरताना दिसली. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अण्णा द्रमुकतील फूटही या सगळ्या निकालानंतर समोर आली. या सगळ्यात तामिळनाडूत भाजपचा चेहरा असलेले अण्णामलाई हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. निकालानंतर केंद्र सरकारच्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातील त्रिभाषा सूत्राला अण्णामलाई यांनी जाहीर विरोध केल्याने, या सगळ्या चर्चांना बळ मिळाले. यातच अण्णामलाई यांनी दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेतल्यानंतर ते राजीनामा देणार की पक्षात थांबणार, या चर्चांना उधाण आलेले आहे. अण्णामलाई यांच्याकडून मात्र याबाबत स्पष्ट भूमिका अद्यापही समोर आलेली नाही, त्यामुळे ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे सध्या सांगण्यात येते आहे. (K Annamalai)
दिल्लीत नेमकं काय घडलं?
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी घेतलेल्या बैठकीमुळे त्यांच्या राजकीय भवितव्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. भाजप सोडून स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या चर्चांदरम्यान अण्णामलाई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष नितीन नवीन आणि संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल. संतोष यांची भेट घेतली. या बैठकांत अण्णामलाई यांनी तामिळनाडू भाजपमधील संघटनात्मक प्रश्न, पक्षाची निवडणूक कामगिरी, तसेच अण्णा द्रमुकसोबतच्या युतीबाबत नाराजी व्यक्त केली. भाजप आणि मित्रपक्षातील काही नेत्यांच्या कार्यपद्धतीबाबतही त्यांनी आक्षेप नोंदवले. मात्र अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत राजीनाम्याचा विषय चर्चेत आला नसल्याचेही सांगण्यात येते आहे. (K Annamalai)
अण्णामलाईंच्या तक्रारीची दखल घेत पुनर्रचना?
पक्ष नेतृत्वाने त्यांच्या तक्रारींवर चर्चा करण्यासाठी वेळ मागितला असून तामिळनाडू भाजपचे विद्यमान अध्यक्ष नैनार नागेंद्रन यांनाही दिल्लीत बोलावण्यात आले. अण्णामलाई यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर तामिळनाडूतील इतरही नेत्यांची मते पक्षश्रेष्ठी जाणून घेत असल्याचे सांगण्यात येते आहे. अण्णामलाई यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांनंतर तामिळनाडू भाजपातील अंतर्गत मतभेद दूर करण्यावर आता पक्षश्रेष्ठींचा भर असेल. तूर्तास अण्णामलाई यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी पक्षाने काही काळ मागितला असून यावर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे. (K Annamalai)
पुढे काय घडणार?
भाजप पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्यावर अण्णामलाई यांचे राजकीय भविष्य आणि तामिळनाडू भाजपची पुढची वाटचालही ठरणार आहे. यातला पहिला पर्याय म्हणजे अण्णामलाई यांच्या राज्यव्यापी जनसंपर्क अभियानाला पाठिंबा देत त्यांना अधिक ताकद दिली जाऊ शकते. संघटनात्मक चौकटीत राहून राज्यात जनाधार वाढवण्याच्या अण्णामलाई यांच्या प्रयत्नांत भाजप मदत करेल. दुसरी शक्यता म्हणजे तामिळनाडू भाजपातील अंतर्गत संघर्ष कमी करण्यासाठी पक्षश्रेष्ठी चर्चा करतील आणि संघटनेत कामाचे योग्य ते वाटप घडवून आणण्यात येईल. तामिळनाडूतील भाजपाच्या संघटनात्मक रचनेत बदल, काही जणांचे राजीनामे आणि नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक हा तिसरा पर्यायही असू शकतो. सध्या राज्यातील भाजपची स्थिती पाहता शिस्तभंगाच्या कारवाईऐवजी संवाद घडवून आणण्याकडेच पक्षश्रेष्ठींचा कल असेल असेही सांगण्यात येते आहे. सध्या तरी अण्णामलाई यांनी भाजपचा अधिकृत राजीनामा दिलेला नाही. भाजप श्रेष्ठी जो निर्णय घेतील, त्यानंतर अण्णामलाईंच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले असेल. (K Annamalai)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.