सूरत: (Surat Bus Accident) गुजरातच्या सुरत जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (MSRTC) दोन बस यांची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात एका बसला भीषण आग लागली होती. मुख्य बाब म्हणजे या बसमध्ये प्रवास करणारे सर्व प्रवासी हे महाराष्ट्रीयन होते. अपघातात ७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, ४१ जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. (Surat Bus Accident)
नेमकं काय घडलं?
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, धुळे-बारडोली रस्त्यावरून जाणारी MSRTC बस बारडोलीकडून धुळे हायवे (उवा गावाजवळ) कडे जात असताना समोरुन येणाऱ्या सुरत–जामनेर सेवेनिवांत बसशी धडकली. आधीच्या अहवालानुसार एक पाण्याचे टँकर पलटी झाल्याचे, समजून न आल्याने एका बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले. ड्रायव्हरने बस वळविण्याचा प्रयत्न केला असता बस महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला गेली आणि समोरून येत असलेल्या दुसर्या बसशी जोरदार धडक झाली. धडक इतकी जबरदस्त होती की एक बस रस्त्याच्या कडेला पडली आणि काही क्षणातच त्याला आग लागली. या आगीत ७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, ४१ जण जखमी आहेत. (Surat Bus Accident)
दरम्यान, आतापर्यंत ७ मृतदेहांमधील फक्त एका मृत व्यक्तीची ओळख पटली असून तो जामनेर-सुरत बसचा ड्रायव्हर म्हणून ओळखला जात आहे. उर्वरित सहा मृतदेह इतके गंभीररित्या जळून गेले आहेत की त्यांची ओळख पटवण्यासाठी डीएनए तपासणीची आवश्यकता आहे, असे बारडोलीतील सरदार शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भावेश पटेल यांनी सांगितले. (Surat Bus Accident)
जखमींना सूरत आणि बारडोलीमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करून प्राथमिक उपचार सुरू आहेत, मात्र काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे. (Surat Bus Accident)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेत मृत झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ते म्हणाले, गुजरातमधील सुरत जिल्ह्यात महाराष्ट्रातील एसटी बसचा अपघात होऊन काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
पुढे ते म्हणाले, एसटी आणि जळगाव जिल्हा प्रशासन सुरत जिल्हा प्रशासनाशी संपर्कात आहेत आणि आवश्यक ती सर्व मदत पुरविली जात आहे. या अपघातात जखमी झालेल्यांची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. (Surat Bus Accident)
गुजरातमधील सुरत जिल्ह्यात महाराष्ट्रातील एसटी बसचा अपघात होऊन काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. एसटी आणि जळगाव जिल्हा प्रशासन सुरत जिल्हा प्रशासनाशी संपर्कात आहेत आणि…
सध्या स्थानिक पोलीस आणि अपघात तपास यंत्रणा घटनास्थळी पोहोचून प्राथमिक चौकशी करत आहेत. वाहनांच्या तपासणीसह ड्रायव्हरच्या हालचाली, रस्त्यावरील अवरोध (टँकर पलटीचे साक्ष्य) आणि वाहतुकीचे रेकॉर्ड तपासण्यात येत आहे. मृतदेहांची ओळख पटविल्यावर आणि प्राथमिक तपासणीनंतर अधिकृत आरोग्य अहवाल व पुढील माहिती स्थानिक प्रशासनाकडून जाहीर केली जाणार आहे. (Surat Bus Accident)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.