हलाल चळवळ आणि जागतिक बाजारपेठेवरील तिचा प्रभाव

    03-Jun-2026   
Total Views |

  
मागील दोन लेखांमध्ये आपण हलाल संबंधी प्राथमिक माहिती आणि हलाल संकल्पना कुराण आणि हदीस मध्ये नेमकी काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न केला.

या लेखात आपण सध्याची हलाल चळवळ काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करूयात.

हलाल चळवळीची सुरवात मांस विक्री व्यवसायापासून झाली. विशिष्ट प्रकारे पशुहत्या केलेले मांस हे हलाल मानले गेले आहे. त्यात एक अट अशीही आहे की पशुहत्या मुसलमान असलेल्या व्यक्तीनेच केली पाहिजे. मुसलमान नसलेल्या व्यक्तीने जरी बिस्मिल्लाहचा उच्चार करून पशुहत्या केली तरी ती हलाल ठरत नाही. आणि इथेच या चळवळीची खरी मेख आहे. आमच्या मान्यतेनुसार आम्हाला हलाल मांसच हवे हा आग्रह धरला गेला आणि अन्य धर्मीयांनाही हलाल पद्धतीने पशुहत्या केल्यासच आपली विक्री वाढेल याची लालूच दाखवली गेली. व्यवसाय वाढविण्यासाठी मग हलाल ची मागणी पुरविण्याकडे कल निर्माण झाला!! याची परिणिती काय झाली? मांस विक्री व्यवसाय हा मुसलमानांच्या नियंत्रणात आला..... कसा? मांस हलाल हवं असेल तर त्यासाठी पशुहत्या करणारा मुस्लीमच हवा. मुस्लिम रिवाजानुसार सर्व सोपस्कार व्हायला हवेत.... म्हणजे व्यवसायाचा मालक गैर मुस्लिम आणि व्यवसाय ताब्यात मुस्लिमांच्या!! किंवा व्यवसायही मुस्लिम मालकाचा!! या चळवळीचा आढावा घेतल्यास जगभरात हा व्यवसाय बहुतांशी मुस्लिम बहुल होत असल्याचे दिसते. भारताच्या दृष्टीने याचा विचार केल्यास २०२५ च्या आकडेवारीनुसार पोल्ट्री आणि प्रक्रिया उद्योग धरून एकूण मांस विक्री व्यवसाय सुमारे ८ लाख कोटी इतका प्रचंड आहे आणि २०३० पर्यंत हा व्यवसाय १४ ते १६ लाख कोटी रुपयांपर्यंत पोचण्याची शक्यता आहे!! यावरून या व्यवसायाची व्याप्ती लक्षात यावी!!.... आणि आता याची व्याप्ती केवळ मांस विक्रीवर सिमित न रहाता जीवनाचे प्रत्येक क्षेत्र व्यापत आहे.... या संबंधी नंतर माहिती घेणारच आहोत....

हलाल चळवळीचे उद्दिष्ट समजून घ्यायचे असेल तर खालील एक वक्तव्य प्रातिनिधिक आहे.....

दि. १२/१२/२०१० या दिवशी कराची येथे डॉ मुस्तफा सेरीक जे बोस्निया चे ग्रँड मुफ्ती आहेत यांचे हे वक्तव्य...."मुसलमानांनी जागतिक अर्थव्यवस्थेवर राज्य करण्यासाठी नेतृत्व करण्याची शक्ती हलाल चळवळीत आहे. यासाठी पश्चिमात्यांकडून आर्थिक समृद्धीचे साधन म्हणून वापरले जाणारे तंत्रज्ञान सोडून मुसलमान समाजाने अन्न उत्पादनाचा शक्तिशाली आधार विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे; कारण अन्न ही प्रत्येक मानवाची मूलभूत आवश्यकता आहे. मलेशिया, तुर्कस्तान आणि इराण हे देश आज हलाल अर्थव्यवस्थेची केंद्रे म्हणून जागतिक स्तरावर उभे रहात आहेत. जागतिक स्तरावर इस्लामी देशांनी हलाल अर्थव्यवस्थेचे महत्व समजून घेणे आवश्यक आहे"....

वक्तव्य छोटेसे आणि संक्षिप्तच आहे पण यात हलाल चळवळीची व्याप्ती लक्षात येऊ शकते!

हलाल चळवळ आणि संकल्पनेची वृद्धी कुठे झाली असेल?? आश्चर्य वाटेल.... इंग्लंड मध्ये!! तिथे यशस्वी झालेली पद्धती जगभरात वापरली जात आहे.... याचा थोडासा आढावा घेऊयात....

दुसऱ्या विश्व महायुद्धानंतरच्या जागतिक अस्थिरतेमुळे इस्लामी देशातील मुसलमानांचे इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. १९६५ नंतर इंग्लंडमध्ये मुसलमान जनसंख्या लक्षणीय प्रमाणात वाढली..... आणि त्यामुळे त्यांच्या मागण्याही सूरु झाल्या!!.... इस्लामी शाळा, मशिदी, हलाल भोजन, इस्लामी वेशभूषा..... याचा परिणाम म्हणून १९७४ मध्ये हलाल पद्धतीला अनुसरून असलेला "पशुवधगृह कायदा" बनविण्यात आला. हलाल मांसाची मागणी वाढू लागली. १९८३ नंतर तर ही मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्याचे पडसादही उमटू लागले. त्यामुळे १९९५ मध्ये "प्राणी कल्याण (हत्या) विनिमय" {The Welfare of Animals (Slaughter or Killing) Regulations 1995} हा कायदा करण्यात आला. (संदर्भ क्र ३). यामुळे प्रतिदिन मांसासाठी केली जाणारी पशुहत्या, तसेच ईदनिमित्त वर्षातून एकदा केली जाणारी कुर्बानी यांच्याकरता परवानाधारक मुसलमान व्यक्तीला हलाल पध्दतीने करण्याची अनुमती मिळाली.

सुरवातीला मांस हे हलाल पद्धतीचेच मिळावे हा आग्रह सुरू झाला. विक्रेते मांसाशी संबंधित हलाल उत्पादने विक्रीसाठी ठेवत नसत. त्यांना हलाल उत्पादने ठेवण्यास बाध्य करण्यासाठी मुसलमान ग्राहक सातत्याने त्यांच्याकडे जाऊन हलाल उत्पादनांची मागणी करू लागले, तसेच हलाल उत्पादने उपलब्ध करून देणाऱ्या विक्रेत्यांकडूनच इतरही संपूर्ण खरेदी करू लागले. त्यामुळे हलाल उत्पादन ठेवणाऱ्या विक्रेत्याकडील अन्यही साहित्याची विक्री होऊ लागली. हे पाहून मग अन्य विक्रेत्यांनीही हलाल उत्पादने विक्रीस ठेवण्यास प्रारंभ केला.... अशा प्रकारे हलाल उत्पादनांना विक्रेत्यांकडे स्थान मिळवून देण्यात आले. आता हलाल कसे ओळखायचे? त्यासाठी त्याच्या प्रमाणिकरणासाठी मागणी सुरू झाली आणि ते सुरूही झाले.

इंग्लंड मध्ये हलाल संकल्पनेचा विस्तार ११९९३ ते १९९७ या कालावधीत कसा झाला ते पाहुयात:-

१. वर्ष १९९३ मध्ये मांसावर प्रक्रिया करून बनविलेल्या पदार्थांना हलाल प्रमाणित करण्यास प्रारंभ करण्यात आला.

२. साखरेला पांढरा रंग येण्यासाठी डुकरांच्या हाडांचा चुरा वापरला जात असे, तसेच आईस्क्रीम मध्येही डुकराच्या चरबीपासून बनविलेल्या इमलसीफायर चा वापर केला जात असे. १९९४ मध्ये हे हराम पदार्थ टाळण्यासाठी आणि उत्पादने हलाल असल्याची निश्चिती होण्यासाठी या पदार्थांना हलाल प्रमाणपत्र देण्यास प्रारंभ करण्यात आला.

३. वर्ष १९९४ मध्ये याच संकल्पनेच्या आधारे प्रक्रिया केलेल्या अन्य खाद्यपदार्थांना आणि उत्पादनांना हलाल प्रमाणित करण्याची मागणी चालू झाली.

४. पूरक आहारात हलाल संकल्पनेचा वापर करण्याचा आग्रह १९९५ मध्ये सुरू झाला.

५. वैद्यकीय औषधी उत्पादने तसेच सौंदर्य प्रसाधने यांनाही हलाल ची संकल्पना १९९७ मध्ये लागू करण्यात आली.

वरील क्रम पहाता अगदी योजनाबद्ध रितीने हलाल संकल्पना रुजविण्यात आलेली दिसेल!!

अगदी अमेरिकेतही जे मुसलमान सीरिया, लबेनॉन आदी इस्लामी देशातून आले त्यांनीही हलाल संकल्पना आग्रहाने रुजविण्याचा प्रयत्न केला. मुक्त अर्थव्यवस्था असणाऱ्या या देशात श्रीमंत बहुराष्ट्रीय कंपन्या आणि मूलतः नागरिक ख्रिस्तबहुल असल्याने त्यांनी मुस्लिमांच्या हलाल मागणीला विशेष महत्व दिले नाही. त्यामुळे अमेरिकेतील मुसलमानांनी त्यांना कायदेशीर रित्या अडचणीत आणून हलाल पुढे झुकण्यास भाग पाडले. त्यापैकी एक प्रकार म्हणजे मुस्लिम ग्राहकांनी या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून अन्नपदार्थ मागवून नंतर त्या संदर्भात हलाल आहार न देऊन त्यांच्या धार्मिक अधिकारांचा भंग केल्याच्या तसेच धार्मिक भेदभाव केल्याच्या याचिका न्यायालयात केल्या. आश्चर्य म्हणजे यातील अनेक याचिका अमेरिकेतील तुरुंगात असणाऱ्या मुसलमान कैद्यांनी केल्या!!. अमेरिकेत धार्मिक भेदभावाच्या संदर्भात पुष्कळच संवेदनशीलता आहे. त्यामुळे या कंपन्यांना याचिका थांबविण्यासाठी आर्थिक तडजोड करून लाखो डॉलर्सची नुकसानभरपाई द्यावी लागली!! मग काय? आर्थिक तोटा टाळण्यासाठी हलाल प्रमाणित आहार उपलब्ध करून देण्यास त्यांनी प्रारंभ केला!!

अमेरिकेत लबेनॉन मधून आलेल्या हाजी याह्या मोहम्मद आवोसी यांच्या परिवाराने आयोवा शहरात १९७४ मध्ये 'मिडामार हलाल' नावाने व्यवसाय सुरू केला. त्यांच्याकडून मुख्यत्वे मलेशिया आणि इंडोनेशिया येथे हलाल मांस निर्यात केले जात होते. १९७५ मध्ये त्यांनी हलाल सर्टिफिकेट देणाऱ्या इस्लामिक सर्व्हिसेस ऑफ अमेरिका (ईसा) ची स्थापना केली!!

अमेरिका परिसरात हलाल संकल्पनेचा प्रसार किती वेगाने होत आहे हे मांडणारा North-America-Halal-Food-Beverage-Market-Outlook-Report-2022-2027 संदर्भ क्र ५ मध्ये जोडलेला आहे. जरूर वाचा!!

अमेरिका आणि कॅनडा स्थित Muslim Students Association National यांचा How to Achieve Halal Food on Campus हा एक रिपोर्ट संदर्भ क्र ६ इथे सोबत जोडत आहे. हलाल मिळण्यासाठी मुस्लिमांनी काय करावे आणि कुठे कुठे काय केले हे सांगणारा हा रिपोर्ट. जरूर वाचा!!

सध्या संपूर्ण युरोप, अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया तसेच आशियाई देशांमध्ये सुद्धा या चळवळीने बरीच मजल मारलेली आहे. मांसाहारापासून सुरवात झालेली हलाल चळवळ आता बरीच पुढे गेलेली आहे. त्याची माहिती आपण नंतर घेणार आहोतच!! त्याची काही उदाहरणे पाहुयात:-

मलेशियामध्ये हलाल संकल्पनेचा विस्तार :-

१. २००७ मध्ये हलाल पर्यटन संकल्पनेचा विस्तार करण्यात आला आणि त्यात २०१७ मध्ये इस्लाम स्टॅंडर्ड चा अंतर्भाव करण्यात आला. याद्वारे मुसलमान पर्यटकांना इस्लामचे पालन करण्यास अनुकूल हॉटेल्स आणि निवासस्थाने यांची निवड करण्याची सुविधा देण्यास प्रारंभ.

२. मलेशियात २०१० मध्ये शरियत आधारित कृषी-जैवतंत्रज्ञान यावर संमेलन झाले. त्यात जैवतंत्रज्ञानाने जनुकीय सुधारित पिके (Genetically Modified) आणि कृषी उत्पादने (हायब्रीड) यांना हलाल मानण्याचा ठराव संमत करण्यात आला.... यात अट अशी की अशी पिके आणि उत्पादने हे ज्यापासून विकसित केली जाणार आहेत त्याचे सर्व मूळ घटक हलाल असले पाहिजेत!!

३. मलेशिया येथे २०१२ मध्ये हलाल परिषद झाली. त्यात हलाल संकल्पनेचा व्यापक उपयोग करण्याचे निश्चित करण्यात आले आणि त्यानुसार विभिन्न क्षेत्रात हलाल संकल्पनेचा आक्रमक रीतीने शिरकाव करण्यात आला.

४. मार्च २०२१ मध्ये 'तुआंकू अब्दुल हलीम मुअदझम शाह' या मोठ्या शॉपिंग मॉल मध्ये 'मजमा' नावाने हलाल क्षेत्र घोषित करण्यात आले.... हलाल मॉल या संकल्पनेचा हा प्रारंभ म्हणावा लागेल.

इंडोनेशिया मध्ये तर २०११ पासून हलाल फॅशन चा आरंभ झाला. 'हिजअप - HIJUP' या कंपनीने आधुनिक पद्धतीच्या इस्लामी परिधनांची विक्री करण्यास आरंभ केला. ही जगातील पहिली इस्लामी हलाल फॅशन कंपनी आहे. सध्या हलाल फॅशन जगभरात मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे!

हलाल संकल्पनेच्या व्यापकतेची कल्पना आल्यामुळे हलाल चा विस्तार करण्यासाठी जागतिक परिषदा सुरू झाल्या. २०१३ मध्ये झालेल्या हलाल जागतिक परिषदेनंतर तर हलाल सर्टिफिकेशन ऑथोरिटी ची व्याप्ती अधिकच गतीने वाढू लागली. त्यानंतर बहुतांश आधुनिक क्षेत्रांमध्ये हलाल संकल्पना लागू करण्यात आली आहे!! हलाल ची व्याप्ती वाढविणे आणि कार्यवाही यावर नियमितपणे कॉन्फरन्स सुरू असतात. इंटरनेट वर हलाल कॉन्फरन्स सर्च केल्यास माहितीचा खजिनाच उपलब्ध आहे!!

ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ओपरेशन (OIC) यांनी हलाल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी इस्लामी देशात उत्पादने निर्यात करायची असल्यास त्या उत्पादनांना हलाल प्रमाणित करणाऱ्या अधिकृत इस्लामिक संघटनेकडून हलाल प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले आहे!!

मंडळी, हलाल ही मूलतः मांस तथा आहार यापुरती मर्यादित असणारी संकल्पना.... पण आज या संकल्पनेने सर्व उद्योग क्षेत्रांना सामावून घेतले आहे! यातून एक हलाल अर्थव्यवस्था साकारली आहे!!

या हलाल संकल्पनेचा विस्तार आणि हलाल अर्थव्यवस्था नक्की काय आहे हे पुढील काही भागात समजून घेऊ.

- अरविंद श्रीधर जोशी

(टीप - धार्मिकतेचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम या संदर्भात झालेले संशोधन आणि अभ्यास सर्वांसमोर मांडला जावा आणि त्या द्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम समजावा आणि ती सुदृढ व्हावी हा या लेखांचा उद्देश आहे. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणे किंवा कोणामध्ये तेढ निर्माण करणे हा यामागील उद्देश नाही)


संदर्भ :-

१. हिंदू जनजागृती समिती प्रकाशित पुस्तक " भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण? हलाल जिहाद?" या पुस्तकात आणखीन काही संदर्भ दिले आहेत

















ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक