ऑपरेशन टायगर पार्ट-२? खासदारांनंतर आता आमदार आणि नगरसेवकही शिंदेंच्या वाटेवर?

Total Views |
 
UBT Crisis
 
खासदारांनंतर आता उबाठाचे आमदार आणि नगरसेवकही फुटणार? महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा राजकीय भूकंप अखेर प्रत्यक्षात आला! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उबाठा गटाला दिलेला हा दुसरा आणि ऐतिहासिक धक्का मानला जातोय. बहुचर्चित ‘ऑपरेशन टायगर’ अखेर यशस्वी झालं. (UBT Crisis)
 
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ९ पैकी तब्बल ६ लोकसभा खासदार बंडखोरी करत वेगळे झाले असून, त्यांनी दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे स्वतंत्र गटाची नोंदणी केली. उद्या, म्हणजेच १९ जूनला शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये हा गट अधिकृतपणे शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याचं म्हटलं जाताय. पण हा झटका केवळ खासदारांपुरता मर्यादित नाही. या खासदारांनंतर आता उबाठाचे आमदार आणि महापालिका नगरसेवकही शिंदेंच्या वाटेवर आहेत का? (UBT Crisis)
 
आता असं देखील म्हटलं जाताय कि, ‘ऑपरेशन टायगर’चा हा केवळ पहिला टप्पा होता. दुसऱ्या टप्प्यात उबाठाच्या उरलेल्या २० आमदारांपैकी तब्बल १५ ते १६ आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर या आमदारांना आपल्या राजकीय भविष्याची चिंता सतावतेय. त्यामुळे आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी हे आमदारही उबाठाला 'जय महाराष्ट्र' करण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. (UBT Crisis)
 
या राजकीय भूकंपाचे हादरे आता थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि विशेषतः मुंबई महापालिकेला बसू शकतात. मुंबई महापालिकेवर २५ वर्ष ठाकरेंची एकहाती सत्ता होती. मात्र आता सत्ता आणि विकासनिधी अभावी स्थानिक आजी-माजी नगरसेवकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. मुंबईत आपलं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मुंबई, कोकण आणि मराठवाड्यातील उबाठाचे नगरसेवक आणि मोठे पदाधिकारी मोठ्या संख्येने शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच म्हटलं जाताय. (UBT Crisis)
 
१९६६ साली स्थापन झालेल्या शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनापूर्वीच उबाठा पूर्णपणे खिळखिळी झालीय. २०२२ च्या पहिल्या बंडानंतर पक्षाची जी काही ताकद उरली होती, ती या दुसऱ्या फुटीने संपण्याच्या मार्गावर आहे. आधी खासदार, मग आमदार आणि आता नगरसेवकही सोडून गेले, तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसमोर पक्षाचं अस्तित्व वाचवण्याचं सर्वात मोठं आव्हान असेल. (UBT Crisis)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com