मुंबई: (Shiv Sena UBT) 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर राहत बंडाची चिन्हे अधिक स्पष्ट केली आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून संबंधित खासदारांवर व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी अपात्रतेची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, कायद्याच्या दृष्टीने पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे खासदारांना अपात्र ठरवता येते का, याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. (Shiv Sena UBT)
उद्धव सेनेने गुरूवारी १८ जून रोजी लोकसभेतील खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे नेते संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे उपस्थित होते. मात्र संजय दिना पाटील, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे अनुपस्थित राहिले. त्यामुळे पक्षातील फुटीच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. (Shiv Sena UBT)
बैठकीनंतर संजय राऊत यांनी अनुपस्थित खासदारांवर पक्षाचा व्हीप झुगारल्याप्रकरणी अपात्रतेची कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. मात्र, घटनात्मक तरतुदी आणि पक्षांतरबंदी कायद्यानुसार हा दावा कितपत ग्राह्य ठरतो, याबाबत कायदेतज्ज्ञांकडून वेगवेगळी मते व्यक्त होत आहेत. (Shiv Sena UBT)
व्हीप नेमका कधी लागू होतो?
भारतीय संविधानाच्या दहाव्या अनुसूचीनुसार (पक्षांतरबंदी कायदा) व्हीप हा केवळ सभागृहातील कामकाजासाठी लागू होतो. विश्वासदर्शक ठराव, अविश्वास प्रस्ताव, विधेयके किंवा इतर महत्त्वाच्या मतदानावेळी पक्षाने जारी केलेल्या व्हीपचे उल्लंघन केल्यास संबंधित खासदार किंवा आमदाराविरुद्ध अपात्रतेची कारवाई होऊ शकते. (Shiv Sena UBT)
मात्र, पक्षाच्या अंतर्गत बैठका किंवा संघटनात्मक कार्यक्रमांसाठी व्हीप लागू होत नाही. त्यामुळे अशा बैठकीला गैरहजर राहिल्याच्या कारणावरून थेट अपात्रता लागू करता येत नाही. (Shiv Sena UBT)
सर्वोच्च न्यायालयाचा काय संकेत?
१९९२ मधील किहोटो होल्लोहन विरुद्ध झाचिल्हू या ऐतिहासिक निकालात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की, पक्षांतरबंदी कायद्याचा उद्देश विधिमंडळातील वर्तन नियंत्रित करणे हा आहे. पक्षाच्या अंतर्गत बैठकीत अनुपस्थित राहणे किंवा संघटनात्मक निर्णयांपासून दूर राहणे हे अपात्रतेचे स्वतंत्र कारण ठरत नाही. (Shiv Sena UBT)
मग पक्ष काय कारवाई करू शकतो?
कायद्यानुसार पक्ष आपल्या अंतर्गत शिस्तभंगाच्या कारवाईअंतर्गत संबंधित सदस्याला कारणे दाखवा नोटीस बजावू शकतो, पदावरून हटवू शकतो किंवा पक्षातून निष्कासितही करू शकतो. मात्र केवळ पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे त्याचे लोकसभा सदस्यत्व रद्द करता येत नाही. (Shiv Sena UBT)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.